आयुष्यात काही वेळा असे प्रसंग येतात, जेव्हा आपल्याला कठीण निर्णय घ्यावे लागतात. त्या निर्णयांवर आपल्या आयुष्याची पुढची दिशा ठरते. असेच निर्णय कलाकारांनाही घ्यावे लागतात, करिअरच्या सुरुवातीच्या काळात चित्रपट निवडताना घेतलेल्या निर्णयांवर त्यांचं पुढचं करिअर ठरतं. अशीच एक अभिनेत्री आहे जिला शाहरुख खान व सलमान खान यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली होती. पण तिने ते चित्रपट नाकारले. हे सर्व चित्रपट नंतर सुपरहिट ठरले, पण या अभिनेत्रीचं करिअर फारसं चमकू शकलं नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या अभिनेत्रीचं नाव दीपशिखा नागपाल आहे. तिने १९९३ मध्ये ‘कानून’ मधून टीव्हीच्या दुनियेत पदार्पण केलं आणि १९९४ मध्ये ‘गँगस्टर’ या चित्रपटातून तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. दीपशिखाने कबूल केलं की तिने ‘करण अर्जुन’ चित्रपटात सलमान खानबरोबर काम करण्यास नकार दिला होता. सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत दीपशिखा म्हणाली, “ज्या दिवशी मी राकेश रोशन यांना पहिल्या दिवशी भेटले, त्याच दिवशी त्यांनी मला करण अर्जुनची ऑफर दिली होती, पण मी लगेच नकार दिला. मी नाही म्हटल्यावर ते माझ्या बहिणीला घेतील असं मला वाटलं होतं, पण आता मला समजलं की त्यांना एक सुंदर मुलगी हवी होती. नंतर ही भूमिका ममता कुलकर्णीने केली.”

IIT दिल्लीतून घेतलं शिक्षण, अभिनयासाठी सोडली चांगल्या पगाराची नोकरी अन्…, अभिनेत्याने ‘चित्वन शर्मा’ बनून जिंकली प्रेक्षकांची मनं

दीपशिखाने शाहरुखच्या ‘ओम शांती ओम’ मध्ये नकारात्मक भूमिका करण्यास नकार दिला होता. इतकंच नाही तर अनिल कपूर यांनी ‘लाडला’ चित्रपटातील एका गाण्याची ऑफर दिली होती, असा दावा दीपशिखाने केला. “अनिल कपूर माझ्याकडे आले आणि ‘लाडला’ गाण्यासाठी मला विचारलं. तो म्हणाला की तू परवीन बाबीसारखी दिसतेस. ते गाणं होतं ‘लडकी है क्या रे बाबा’. मी त्याचं ऐकून घेतल्यावर नकार दिला. मी म्हणाले की मला तुमच्याबरोबर एक चित्रपट करायचा आहे,” असं ती म्हणाली.

श्वेता बच्चन आई-वडिलांसह मुंबईत का राहते? पतीबरोबर न राहण्याचं कारण काय? जाणून घ्या

दीपशिखाने तिच्या करिअरमध्ये एकदा नव्हे तर दोनदा सलमान खानचे चित्रपट नाकारले. ‘करण अर्जुन’ नंतर तिला सलमान खान, उर्मिला मातोंडकरच्या ‘जानम समझा करो’ मध्ये महत्त्वाच्या भूमिकेची ऑफर देण्यात आली पण तिने ही भूमिका करण्यास नकार दिला होता. करिअरच्या सुरुवातीला अतिआत्मविश्वासामुळे अनेक संधी हातून जाऊ दिल्याचा पश्चाताप दीपशिखाला आहे. ती शेवटची ‘ना उम्र की सीमा हो’ व ‘पलकों की छांओं में २’ मध्ये दिसली होती. ती आता टीव्हीवर काम करते, पण तिला चित्रपटांच्या फारशा ऑफर्स येत नाहीत.

श्वेता बच्चन अन् कपूर कुटुंबाचं आहे खास नातं, अमिताभ बच्चन यांचे जावई निखिल नंदा व रणबीर कपूर एकमेकांचे…

फिल्मी करिअरप्रमाणेच दीपखिशाचे वैयक्तिक आयुष्यही चढ-उतारांनी भरलेले होते. तिने वयाच्या २० व्या वर्षी अभिनेता जीत उपेंद्रशी लग्न केलं, त्यांना दोन मुलं झाली. पण १० वर्षांच्या संसारानंतर त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर २०१२ मध्ये तिने केशव अरोराशी दुसरं लग्न केलं, पण हे लग्नही टिकलं नाही आणि अवघ्या चार वर्षांत २०१६ मध्ये ते विभक्त झाले. दीपशिखाला आरती नागपाल नावाची एक मोठी बहीण असून तीही अभिनेत्री आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deepshikha nagpal rejected movies with salman khan shahrukh khan now working on tv divorced twice hrc