दीप्ती नवल ७० च्या दशकाच्या सुरुवातीला न्यूयॉर्कमध्ये शिकत होत्या. त्यावेळी त्यांनी रेडिओवर ‘रंग महाल’ नावाचा संगीतावर आधारित कार्यक्रम होस्ट केला होता. त्या अमेरिकेतील भारतीयांसाठी जुनी हिंदी गाणी वाजवायच्या. “तेव्हा, न्यूयॉर्कमधील भारतीय लोक खूप कमी होते आणि ‘रंग महाल’ कार्यक्रम त्यांच्यासाठी होता,” अभिनेत्री सांगते.

भारतातून न्यूयॉर्कला येणाऱ्या सेलिब्रिटींनी या शोमध्ये यावं, असं दीप्ती यांना वाटत होतं. त्यांनी प्रयत्न सुरू केले आणि पहिली मुलाखत सुनील दत्त यांची घेतली होती. “मी खूप घाबरले होते. मी त्यांची मुलाखत घेण्याऐवजी, दत्त साहेबांनी माझ्याकडून माईक घेतला आणि माझ्याशी माझ्या आयुष्याबद्दल गप्पा मारू लागले. मग त्यांनी मला त्यांच्याबद्दल सांगितलं,” अशी आठवण दीप्ती यांनी सांगितली.

हेही वाचा – “आपल्या संस्कृतीत…”, सोनाक्षी सिन्हा भडकल्यावर मुकेश खन्ना यांचं स्पष्टीकरण; शत्रुघ्न सिन्हांचे नाव घेत म्हणाले…

एकदा राज कपूर न्यूयॉर्कला आले होते, तोपर्यंत दीप्ती यांनी तीन-चार मुलाखती घेतल्याने थोडा आत्मविश्वास आला होता. त्या राज कपूर यांच्या चाहत्या होत्या. ‘जागते रहो’, ‘श्री 420’ आणि ‘जिस देश में गंगा बहती है’ हे चित्रपट त्यांना खूप आवडायचे. दीप्ती यांनी या चित्रपटांबद्दल नेमकं काय आवडलं होतं, ते सांगितलं. दीप्ती राज यांना ‘मॅन ऑफ म्युझिक’ म्हणाल्या.

राज कपूर यांची मुलाखत

दीप्ती यांना न्यूयॉर्कमध्ये मुलाखतीसाठी राज कपूर यांना भेटता आलं होतं. राज मुलाखतीसाठी तयार झाल्यावर कॉलेजमधील काही मैत्रिणींबरोबर मोठे टेप रेकॉर्डर घेऊन दीप्ती मुलाखतीसाठी पोहोचल्या होत्या. “ते खूप प्रेमळ होते, त्यांच्याशी त्यांचे आयुष्य आणि कामाबद्दल गप्पा मारल्या होत्या. त्यांना कशामुळे प्रेरणा मिळाली आणि त्यांच्यासाठी काय महत्त्वाचं आहे हे विचारल्यावर ते मनमोकळेपणाने बोलले होते,” असं दीप्ती नवल यांनी सांगितलं. आता त्या मुलाखतींच्या प्रती असायला हव्या होत्या, असं त्यांना वाटतं. “आता ‘रंग महाल’चं काहीच उरलं नाही,” असं म्हणत त्यांनी निराशा व्यक्त केली. राज कपूर यांना पहिल्यांदा भेटले होते, तो क्षण आयुष्यातील सर्वात चांगल्या क्षणांपैकी एक होता, असं दीप्ती यांनी नमूद केलं.

हेही वाचा – ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिका संपणार! ४ वर्षे गाजवलं अधिराज्य, शेवटच्या दिवसाच्या शूटिंगचा व्हिडीओ आला समोर

मुंबईत झालेली भेट

मुंबईत दीप्ती यांना पुन्हा राज कपूर यांना भेटता आलं. यावेळी त्यांच्याबरोबर अनिल कपूर होते. दीप्ती स्वत: चित्रपट करू लागल्या होत्या. त्यावेळी राज कपूर यांचे धाकटे चिरंजीव राजीवदेखील तिथे होते. राजीव दीप्ती यांना म्हणाले की राज कपूर यांनी तुमचे ‘एक बार फिर’, ‘चश्मे बद्दूर’ आणि ‘साथ साथ’ पाहिले असून तुमच्या कामाचे कौतुक केले आहे.

हेही वाचा – ॲटलीच्या दिसण्यावरून कमेंट करण्याबद्दल कपिल शर्माने दिलं उत्तर; म्हणाला, “मेंढरासारखे कोणाचेही…”

त्यांच्याबरोबर काम करता आलं नाही, पण…

“मला त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली नाही, पण मी राजजींना काही वेळा भेटले होते. ते खूप प्रेमळ होते. एकदा माझ्या वाढदिवसाच्या पार्टीत ते पाहुणे म्हणून आले होते. ते माझ्या घरी आले, याचा मला खूप अभिमान आहे. मी नवीन घर घेतल्यावर ते मला शुभेच्छा देण्यासाठी आले होते. त्यावेळी माझे वडीलही तिथे होते,” असं दीप्ती नवल म्हणाल्या.

दीप्ती नवल राज कपूर यांच्या अंत्यसंस्काराला गेल्या होत्या, ती शेवटची भेट असल्याचं सांगतात. “टॅक्सी व रिक्षा बदलत मी त्यांच्या अंत्यसंस्काराला गेले होते. त्यांचे अंतिम संस्कार सुरू होते, चिता आधीच जळत होती. मी तिथेच शांत उभी राहिले. त्यावेळी मला मी त्यांना पहिल्यांदा भेटले ते आठवलं. अचानक, मला जाणवलं की तिथे मी एकटीच महिला आहे. अंत्यसंस्काराच्या वेळी कुटुंबियांनी महिलांना तिथे जाऊ दिलं नव्हतं. पण नकळत, मी राजजींना अंतिम निरोप देण्यासाठी थेट तिथे पोहोचले होते,” असं दीप्ती यांनी सांगितलं.

Story img Loader