‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. याबरोबरच ते ट्विटरच्या माध्यामातून त्यांची मतं मांडत असतात. आता मात्र विवेक अग्निहोत्री एका वेगळ्याच अडचणीत सापडले आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाने विवेक अग्निहोत्री यांना लवकरच न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भीमा कोरेगांव हिंसा प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा यांना दिलासा देऊन या प्रकरणी पक्षपात केल्याचा आरोप विवेक अग्निहोत्री यांनी जस्टीस एस. मुरलीधर यांच्यावर केला होता. गौतम नवलखा यांना घरी नजरकैदेत ठेवण्याचा आदेश कोर्टाकडून मागे घेण्यात आला होता. या प्रकरणीच विवेक अग्निहोत्री यांनी एस मुरलीधर यांच्यावर टीका टिप्पणी करणारं वक्तव्य केलं होतं.

आणखी वाचा : “सध्याची हिंदी गाणी…” लोकप्रिय गायक कुमार सानू यांनी व्यक्त केली संगीतविश्वाबद्दल खंत

यानंतर मुरलीधार यांच्यावर केलेल्या या टिप्पणीकडे विशेष लक्ष घालण्यात आलं आणि २०१८ साली विवेक अग्निहोत्री यांच्यासह लेखक आनंद रंगनाथन आणि स्वराज्य न्यूज पोर्टल यांच्याविरोधात मानहानीची केस चालवण्यात आली. या प्रकरणात विवेक अग्निहोत्री यांनी जाहीर माफी मागितली असूनही दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना १० एप्रिल रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची प्रचंड चर्चा झाली. इस्रायली फिल्ममेकर नदाव लॅपिड यांनी या चित्रपटाच्या विरोधात केलेल्या वक्तव्यामुळे विवेक अग्निहोत्री चांगलेच आक्रमक झाले होते. सध्या ते त्यांच्या आगामी ‘द व्हॅक्सीन वॉर’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. या चित्रपटात अनुपम खेर, नाना पाटेकर, पल्लवी जोशी, सप्तमी गौडा हे नावाजलेले कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi high court direct the kashmir files director vivek agnihotri to appear in person avn