सुकेश चंद्रशेखरच्या २०० कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचेही नाव आहे. या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जॅकलिन अनेकदा चौकशी केली आहे. जॅकलिन या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने दाखल केलेले पुरवणी आरोपपत्र रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली आहे. यावर आता दिल्ली उच्च न्यायालयाने नुकतीच सुनावणी झाली आहे.
जॅकलिन फर्नांडिसने मनी लाँड्रिंग प्रकरणात दाखल केलेला एफआयआर आणि आरोपपत्र रद्द करण्याची मागणी करत दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. जॅकलिनने या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दाखल केलेले पुरवणी आरोपपत्र रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली आहे. यावर आता दिल्ली उच्च न्यायालयाने प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा-
एफआयआर रद्द करण्याच्या जॅकलिनच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी ईडीकडून उत्तर मागितले. याप्रकरणी उच्च न्यायालयाने ईडीला नोटीस बजावली आहे. जॅकलिनच्या याचिकेवर न्यायमूर्ती ज्योती सिंह यांनी ईडीला नोटीस बजावली आहे. आता याप्रकरणी पुढील सुनावणी २९ जानेवारीला होणार आहे. आपल्या याचिकेत जॅकलिनने ईडीने दाखल केलेले दुसरे सप्लिमेंटरी चार्जशीट फेटाळण्याची मागणीही केली आहे. तसेच ट्रायल कोर्टासमोर प्रलंबित असलेल्या संबंधित कार्यवाही रद्द करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
सुकेश २०० कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या तो तिहार तुरुंगात बंद आहे. सुकेशने जॅकलिनला ५२ लाख रुपये किमतीचा घोडा व ९ लाख रुपयांची पर्शियन मांजर गिफ्ट म्हणून दिली होती. या प्रकरणी जॅकलिनबरोबर नोरा सारा अली खान, चाहत खन्ना या अभिनेत्रींचे नाव जोडण्यात आले होते. तसेच फोर्टिस हेल्थकेअरचे माजी प्रमोटर शिविंदर मोहन सिंह यांच्या पत्नी अदिती सिंह यांचीही सुकेशने फसवणूक केली आहे.