अभिनेते सतीश कौशिक यांचे ९ मार्च रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मृत्यूच्या काही तास आधी त्यांनी एका होळी पार्टीला हजेरी लावली होती. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, त्यात एक मोठा खुलासा झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सतीश ज्या पार्टीत उपस्थित होते, त्या पार्टीत एक वाँटेड बिझनेसमॅनही उपस्थित होता. पोलिसांनी पाहुण्यांच्या यादीची तपासणी केली, त्यामध्ये या बिझनेसमॅनचं नाव समोर आलं आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Video: “मी आजही त्याला फोन करणार होतो, पण…” अभिनेते अनुपम खेर सतीश कौशिक यांच्या आठवणीत भावूक; व्हिडीओ केला शेअर

दिल्ली पोलीस सतीश कौशिक यांच्या निधनानंतर तपास करत आहे. चौकशीसाठी ते सतीश कौशिक यांनी ज्या फार्महाऊसमध्ये होळी पार्टीला हजेरी लावली होती, तिथे पोहोचले. ‘एएनआय’च्या वृत्तानुसार, तपास पथकाने फार्महाऊसमधून काही संशयास्पद औषधं जप्त केली आहेत. “फार्महाऊसमध्ये एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते, जे एका उद्योगपतीच्या मालकीचे होते,” असे दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान, पोलीस सध्या सतीश कौशिक यांच्या पोस्ट मॉर्टम रिपोर्टची वाटत पाहत आहेत.

सतीश कौशिक हे दिल्लीतील बिजवासन येथील फार्महाऊसवर होते. तिथे त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि त्यांना तातडीने गुरुग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक तपासणीत हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचं निधन झालं होतं. अशातच फार्महाऊसबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पण, त्याचा सतीश कौशिक यांच्या निधनाशी काही संबंध आहे की दोन्ही प्रकरणं वेगळी आहेत, याबद्दल स्पष्टता नाही.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi police recovers medicines from farmhouse where satish kaushik stayed hrc