वसईतील श्रद्धा वालकर या २६ वर्षीय तरुणीची दिल्लीत तिच्या प्रियकाने निर्घृण हत्या केली. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या या हत्याकांडाचं गूढ उकलल्यानंतर देशभरात संतापाचं वातावरण आहे. श्रद्धाचा प्रियकर आफताब अमीन पूनावाला (२८) याने दिल्लीत राहत्या घरी श्रद्धाची हत्या केली. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने मृतदेहाचे ३५ तुकडे केले आणि फ्रिजमध्ये ठेऊन तब्बल तीन आठवडे तो टप्प्याटप्प्यात त्याची विल्हेवाट लावत होता. या धक्कादायक घटनेसारखीच एका अभिनेत्रीची हत्या करण्यात आली होती. एका दशकापूर्वी घडलेल्या या घटनेने चित्रपटसृष्टीला हादरवून सोडलं होतं. मीनाक्षी थापर असं या अभिनेत्रीचं नाव होतं.

हेही वाचा – “मेरा अब्दुल ऐसा…” श्रद्धा वालकर हत्याप्रकरणावर केतकी चितळेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

MLA Sandeep Kshirsagar On Santosh Deshmukh
Santosh Deshmukh Murder : संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला अद्याप अटक का नाही? पोलिसांवर दबाव आहे का? संदीप क्षीरसागर स्पष्टच बोलले
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
youth attacked police Mumbai, youth obstructed traffic ,
मुंबई : वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या तरुणाचा पोलिसावर हल्ला, हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल
Image Of Supriya Sule.
Supriya Sule : “मी मुख्यमंत्र्यांची विरोधक आहेच पण…”, बीड आणि परभणी प्रकरणी सुप्रिया सुळेंचे फडणवीसांना आवाहन
Allu Arjun rejects Telangana CM claim
महिलेच्या मृत्यूनंतरही अल्लू अर्जुन थिएटरमध्ये थांबला, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचा दावा; अभिनेता म्हणाला, “मी इतका…”
atrocities committed on name of religion in world are due to misconceptions says Sarsangchalak mohan bhagwat
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणाले, “चुकीच्या समजुतीतून धर्माच्या नावाखाली अत्याचार…”
death of young man walking with a Jain Sadhvi in accident
जैन साध्वी सोबत चालत जाणाऱ्या युवकाचा अपघाती मृत्यू
Police arrested three men for killing young man on Tuljaram College Road Baramati
बारामतीत तरुणाचा खून करुन पसार झालेले तिघे, गजाआड

मीनाक्षी थापर ही मूळची उत्तराखंडची राजधानी डेहराडूनची होती. तिने एव्हिएशनचा डिप्लोमा पूर्ण केला होता. त्यानंतर बॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्यासाठी ती मुंबईत आली. येथे सुरुवातीला तिने अनेक जाहिरात चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका केल्या. नंतर २०११ मध्ये ‘404’ या हॉरर चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. काही दिवसांनी मधुर भांडारकरने मीनाक्षीला ‘हिरोईन’ चित्रपटामध्ये ज्युनियर अभिनेत्रीची भूमिका ऑफर केली.

हेही वाचा – “त्या रक्षासाला…” श्रद्धा वालकर हत्याप्रकरणी अभिनेत्री स्वरा भास्करने व्यक्त केला संताप; ट्वीट व्हायरल

२०१२ साली ‘हिरोईन’ चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं. याच दरम्यान, एके दिवशी मीनाक्षीच्या अपहरणाची बातमी आली. मीनाक्षीची आई तिला फोन करत होती, पण तिचा फोन बंद होता. घरच्यांना वाटलं की ती शूटिंगमध्ये व्यग्र असेल. पण अशातच १५ मार्च २०१२ रोजी मीनाक्षीच्या कुटुंबीयांना अपहरणकर्त्यांचा खंडणीसाठी फोन आला. कुटुंबीयांना यामुळे धक्का बसला आणि त्यांनी तत्काळ पोलिसांना याची माहिती दिली.

हेही वाचा – “मुलींनी जरा…” श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी अभिनेते शरद पोंक्षे यांची प्रतिक्रिया

पोलिसांनी मीनाक्षीचा शोध सुरू केला आणि अपहरणकर्त्यांचे नंबर ट्रॅक केले. अपहरणकर्ते मुंबईपासून १५०० किमी दूर अलाहाबादमध्ये असल्याचं आढळलं. पोलीस अलाहाबादला पोहोचले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण, त्यांना मीनाक्षी नाही तर तिचा मृतदेह सापडला, तोही अनेक तुकड्यांमध्ये. अलाहाबादमध्येच एका घराच्या पाण्याच्या टाकीत मीनाक्षीचे धड सापडले होते. तर, लखनऊ-अलाहाबाद सीमेवरील जंगलातून तिचं डोकं जप्त करण्यात आलं होतं.

हेही वाचा – Shraddha Murder: “श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करणाऱ्या आफताब पूनावालाचं भाजपाच्या शहजाद पूनावालांशी नातं काय?”

पोलिसांनी मीनाक्षीचा खून करणाऱ्या सुरीन, अमित आणि प्रीती यांना अटक केली. तेव्हा त्यांनी हत्येचे धक्कादायक कारण सांगितले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार, मीनाक्षीने प्रीतीला सांगितले होते की ती नेपाळमधील एका राजघराण्याशी संबंधित आहे आणि तिच्याकडे अमाप संपत्ती आहे. प्रीतीला या संपत्तीचा लोभ आला आणि तिने अमित व सुरेनबरोबर मिळून तिची हत्या करण्याचा कट रचला.

हेही वाचा – Shraddha Murder Case: …म्हणून मृतदेहाच्या ३५ तुकड्यांची विल्हेवाट लावताना आफताब वापरत होता श्रद्धाचं Instagram अकाऊंट

आरोपींनी मीनाक्षी थापरला एका भोजपुरी चित्रपटात मुख्य भूमिका मिळवून देण्याचे आमिष दाखवून अलाहाबादला आणले होते. तिथून त्यांनी तिचे अपहरण केले, त्यानंतर तिच्या कुटुंबीयांना खंडणीसाठी फोन केला. मात्र, अपहरणाची माहिती पोलिसांना मिळाल्याचे समजताच ते घाबरले आणि स्वतःचा पोलिसांपासून बचाव करण्यासाठी त्यांनी मीनाक्षीची हत्या केली होती.

Story img Loader