९० च्या दशकात झीनत अमान(Zeenat Aman) या बॉलीवूडमधील सर्वांत सुंदर अभिनेत्रींपैकी एक होत्या. १९७१ साली देव आनंद( Dev Aanand) यांनी त्यांच्याबरोबर ‘हरे रामा हरे कृष्णा’ या चित्रपटात काम केले. त्यानंतर त्यांच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली होती. महत्त्वाचे म्हणजे अनेक जण त्यांच्या प्रेमात पडत होते आणि बहुतेक जण त्यांच्याशी लग्न करण्याची इच्छा मनाशी बाळगून होते. यूएस, कॅलिफोर्नियामधून आलेली २० वर्षांच्या सुशिक्षित तरुणी होत्या. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर बॉलीवूडमधील दिग्गज अभिनेत्री म्हणून त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली. या काळात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरदेखील मोठ्या चर्चा झाल्या. झीनत अमान यांनी संजय खान यांच्याबरोबरचे नाते सार्वजनिकरीत्या स्वीकारले होते. त्याबद्दल त्यांनी खुलासाही केला होता. त्याबरोबरच संजय खान यांनी त्रास दिल्याचेदेखील त्यांनी म्हटले होते. बॉलीवूडमध्ये असे अनेक कलाकार होते, ज्यांनी झीनत अमान यांच्याबरोबर लग्न करण्याचे स्वप्न पाहिले; मात्र निराशाच त्यांच्या पदरी पडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

झीनत अमान यांच्या प्रेमात बुडालेले देव आनंद

देव आनंद यांच्यामुळे झीनत अमान यांच्या करिअरला एक वेगळी दिशा मिळून, त्यांना मोठी लोकप्रियता मिळाली होती. जेव्हा २० वर्षीय झीनत अमान यांच्याबरोबर देव आनंद यांनी चित्रपटात काम केले तेव्हा त्यांचे वय ४७ होते. त्यानंतर झीनत अमान यांनी सत्यम शिवम सुंदरम या चित्रपटाच्या करारावर सह्या केल्या. हा चित्रपट १९७८ साली प्रदर्शित झाला. दरम्यानच्या काळात देव आनंद झीनत अमान यांच्या प्रेमात पडले. त्यांना त्यांच्या मनातील भावना, प्रेम रोमँटिक पद्धतीने अभिनेत्रीला सांगायचे होते. त्याबद्दल देव आनंद यांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये याबद्दल लिहिले आहे.

देव आनंद यांनी त्यांच्या ‘रोमॅन्सिंग विथ लाइफ'(Romancing with life) या ऑटोबायोग्राफीमध्ये लिहिले, “एके दिवशी मला जाणीव झाली की, मी झीनतच्या खूप प्रेमात आहे आणि मला तिला हे सांगायचे आहे. तिला सगळे खरे सांगण्यासाठी मी ताज येथे एका रोमँटिक ठिकाणी भेटण्याचे ठरवले. जिथे आम्ही आधी एकदा जेवणसुद्धा केले होते.”

“मेट्रो सिनेमा येथे ‘इश्क, इश्क, इश्क’च्या प्रीमियरनंतर जमलेल्या प्रेक्षकांसमोर राज कपूर यांनी झीनतला किस करत तिच्या सादरीकरणासाठी तिचे अभिनंदन केले. त्यामुळे तिची सायंकाळ अजून सुंदर झाली असणार. ते पाहिल्यानंतर माझ्यात ईर्षा निर्माण झाली,” असेही त्यांनी म्हटले आहे.

“राज कपूर यांनी अशा प्रकारे केलेल्या कौतुकाचा झीनतने शांत आणि विनम्रपणे प्रतिसाद दिला. झीनत माझ्यासाठी पूर्वीसारखी झीनत राहिली नाही. माझ्या हृदयाचे तुकडे झाले”, असे देव आनंद यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिले आहे. याबरोबरच, राज कपूर यांनी झीनत अमान यांच्याकडे त्यांचे वचन न पूर्ण केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. ‘जेव्हा जेव्हा झीनत अमान राज कपूर यांच्याबरोबर असतील तेव्हा तेव्हा त्या पांढऱ्या रंगाची साडी नेसतील’, असे ते वचन होते. असा त्या कार्यक्रमात घडलेला प्रसंगही देव आनंद यांनी त्यांच्या आत्मचरित्रात स्पष्ट केला आहे.

हेही वाचा: भर कार्यक्रमात दीपिका पादुकोणच्या डिप्रेशन अन् मातृत्वावर केला विनोद; नेटकऱ्यांनी सुनावल्यावर कॉमेडियन म्हणाला, “माझ्या कमेंट…”

दरम्यान, झीनत अमान यांनी अनेकदा राज कपूर यांच्याबरोबर कोणतेही ‘रिलेशनशिप’ नव्हते, असे स्पष्ट केले आहे. त्याबरोबरच देव आनंद यांच्या मनात माझ्याविषयी काय भावना होत्या याबद्दल मला कोणतीही कल्पना नव्हती, असेही झीनत अमान यांनी अनेक मुलाखतींमधून सांगितले आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dev aanand reveled in autobiography he was madly love with zeenat aman heart broken when he saw raj kapoor kissing her nsp