बॉलिवूडच्या कलाकारांना सार्वजनिक ठिकाणी फिरताना अनेकदा चाहते, फोटोग्राफर यांना सामोरे जावे लागते. विमानतळावर जाताना अनेकदा फोटोग्राफर छते सेल्फीसाठी आग्रह धरतात. बॉलिवूडचा अभिनेता सुनील शेट्टीचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसून येत आहे. या व्हिडिओमध्ये सुनील एअरपोर्टमधून बाहेर पडताना दिसत आहे. या व्हिडीओच नेटकरी कौतूक करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोणताही कलाकार विमानतळावर आल्यावर चाहते फोटोसाठी गर्दी करतात. सुनील विमानतळावरून बाहेर त्यात असताना एक चाहता त्याच्या मुलाला घेऊन त्याच्याकडे आला. दरम्यान, सुनील शेट्टीने या गोंडस मुलाला उचलून घेतले या व्हिडीओमध्ये त्याने मुलाबरोबर मस्ती केली. सुनील यावेळी कॅज्युअल लूकमध्ये दिसून आला.

‘पठाण’नंतर शाहरुख खान सलमानच्या ‘या’ चित्रपटात दिसणार? चर्चांना उधाण

सुनील शेट्टी सध्या चर्चेत आहे. त्याच्या धारावी बँक या वेबसीरीजचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. गुन्हेगारी विश्वाचा सर्वेसर्वा ‘थलाईवन’ हे पात्र सुनील शेट्टीने साकारलं आहे. याबरोबरच विवेक ओबेरॉयसुद्धा यामध्ये जेसीपी जयंत गावस्कर या पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.

सुनील शेट्टी अनेकवर्ष बॉलिवूडमध्ये कार्यरत आहे. बलवान चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. ‘दिलवाले’, ‘पहचान’, ‘मोहरा’, ‘हेरा फेरी’, ‘मै हू ना’ यांसारख्या विविध चित्रपटातून त्याने काम केले आहे. अभिनयाच्या व्यक्तिरिक्त तो व्यावसायिकदेखील आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dharavai bank actor sunil shetty spotted at airport having fun with small child spg