अमिताभ बच्चन यांचा ‘ऊंचाई’ हा चित्रपट पुढच्या महिन्यामध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामधील त्याचा लूक असलेले पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले. त्यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधन या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. या चित्रपटामध्ये त्यांच्या व्यतिरिक्त अनुपम खेर आणि बोमन इराणी प्रमुख हे कलाकार भूमिकेमध्ये आहेत. ते या चित्रपटामध्ये ‘अमित श्रीवास्तव’ हे पात्र साकारणार आहेत. राजश्री फिल्म्सच्या सूरज बरजात्या यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

या चित्रपटाबद्दल अभिनेते धर्मंद्र यांनी एक ट्वीट केले आहे. त्यांनी सोशल मीडियाद्वारे अमिताभ आणि ‘ऊंचाई’ या चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ट्विटरवर ‘शोले’ चित्रपटातील फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी अमिताभ यांना ‘बॉलिवूडमधील सर्वोत्तम अभिनेता’ अशी उपाधी दिली आहे. अमिताभ आणि धर्मंद्र यांनी बऱ्याच सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘शोले’ चित्रपटामध्ये त्यांच्यावर चित्रीत झालेले ‘ये दोस्ती..’ हे गाणं फार गाजले होते. त्यांच्यामध्ये आजही फार घनिष्ठ मैत्री आहे.

आणखी वाचा – मनसेकडून ‘स्टार नेटवर्क’ला ४८ तासांचा अल्टीमेटम; जाणून घ्या नेमकं घडलंय तरी काय

धर्मंद्र यांनी या ट्वीटमध्ये “अमित खूप प्रेम. तू राजश्री फिल्म प्रोडक्शनच्या चित्रपटामध्ये काम करत आहेस अशी माहिती मिळाली. मस्त. बॉलिवूडमधील सर्वोत्तम अभिनेता आणि सर्वोत्तम निर्मिती संस्था एकत्र काम करत असल्याचा मला आनंद आहे. तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा” असे लिहिले आहे. धर्मंद्र गेल्या काही वर्षांपासून सिनेसृष्टीपासून लांब राहिले आहेत. २०१८ मध्ये त्यांनी या क्षेत्रापासून काही काळ ब्रेक घेण्याचे ठरवले. ते ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा कमबॅक करणार आहेत.

आणखी वाचा – जेव्हा अमिताभ बच्चन यांनी प्रचार करूनही निवडणूक हरले होते मुलायम सिंह यादव; दोघांच्या मैत्रीचा खास किस्सा

अमिताभ यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त फिल्म हेरिटेज फाउंडेशन आणि पीव्हीआर सिनेमा यांनी मिळून ‘बच्चन बॅक टू बिगिनिंग’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम उद्या म्हणजेच ११ ऑक्टोबरला समाप्त होणार आहे. काही दिवसांपूर्वी खुद्द अमिताभ बच्चन यांनी याबद्दलची माहिती दिली होती.

Story img Loader