देओल कुटुंब गेल्या काही दिवसांपासून चांगलंच चर्चेत आहे. धर्मेंद्र यांचा नातू व सनी देओलचा मोठा मुलगा करण देओल १८ जून रोजी द्रिशा आचार्यबरोबर विवाह बंधनात अडकला. या लग्नात बॉबी देओल, त्याची पत्नी तान्या व मुलगा आर्यमान यांच्यासह धर्मेंद्र व त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौर या सर्वांनी हजेरी लावली. मात्र धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या पत्नी हेमा मालिनी व त्यांच्या मुली या लग्नाला हजर नव्हत्या. अशातच आता धर्मेंद्र यांनी पत्नी हेमा तसेच दोन्ही मुलींसाठी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी देवेंद्र फडणवीसांची मोठी अपडेट; म्हणाले, “पुरावे विश्वासार्ह…”

धर्मेंद्र यांनी लेक ईशाबरोबरचा एक फोटो शेअर करत त्याला भावनिक कॅप्शन दिलं आहे. “ईशा, अहाना, हेमा आणि माझ्या सर्व प्रिय मुलांनो… तख्तानी आणि वोहरा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तुम्हा सर्वांचा मनापासून आदर करतो…वय आणि आजारपण मला सांगतंय की मी तुमच्याशी वैयक्तिकरित्या बोलू शकलो असतो… पण” असं त्यांनी या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

धर्मेंद्र यांच्या पोस्टवर त्यांचे चाहते व बॉलिवूडमधील कलाकार कमेंट्स करून काळजी घेण्यास सांगत आहे. तसेच त्यांचा जावई भरत तख्तानीने “Love you Papa” अशी कमेंट केली आहे. दरम्यान, धर्मेंद्र आता ८७ वर्षांचे झाले आहेत. वाढत्या वयामुळे त्यांना फारसं बाहेर पडणं शक्य होत नाही. बऱ्याच दिवसांनी ते नातवाच्या लग्नात व रिसेप्शनमध्ये दिसले होते.

Story img Loader