ईशा देओल बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर ईशाने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. सध्या ईशा अभिनयापासून लांब असली तरी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांना अपडेट देत असते. अभिनयाव्यतिरिक्त ईशा आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असते.

लग्नाच्या ११ वर्षांनंतर ईशा पती भरत तख्तानीबरोबर घटस्फोट घेणार आहे. ईशा व भरत परस्पर संमतीने विभक्त होत आहेत. ईशाने सांगितले की, तिने मुलांचा विचार करूनच हा निर्णय घेतला आहे. ईशाच्या या निर्णयाने वडील धर्मेंद्र यांना मोठा धक्का बसला आहे. नुकतीच त्यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

What happens when you drink Clove lemon tea every day health news
दररोज एक कप लिंबू-लवंगयुक्त चहाचे सेवन करा अन् शरीरातील ‘हे’ बदल पाहा; तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
What Manoj Jarange Said?
Manoj Jarange : मनोज जरांगेंचं वक्तव्य, “धनंजय मुंडे रात्री दोन वाजता भेटले होते, वाल्मिक कराडही होता, सगळे पाया पडले आणि…”
Milind Gawali
मिलिंद गवळींनी पत्नीबद्दल सांगितला लग्नानंतरचा भन्नाट किस्सा; म्हणाले, “सात फेरे झाल्यानंतर…”
gajlakshmi
२६ जुलैपासून ‘या’ ३ राशींवर होईल माता लक्ष्मीची कृपा! शुक्र-गुरुच्या युतीमुळे निर्माण होईल ‘गजलक्ष्मी राजयोग’, चांगले दिवस येणार
rakesh roshan
“वाईट बातमी…”, गोळीबाराच्या घटनेनंतरही राकेश रोशन यांना हृतिकसाठी अंडरवर्ल्डमधून यायचे धमक्यांचे फोन; खुलासा करत म्हणाले…
madhuri dixit reveals both sons having inherited love for cooking
“माझ्या दोन्ही मुलांना…”, माधुरी दीक्षितने पतीला ‘या’ गोष्टीचं दिलं श्रेय, आठवण सांगत म्हणाली, “अमेरिकेत असताना…”
Man sets himself on fire
पत्नीनं घटस्फोटाचा अर्ज मागे घेण्यास दिला नकार, पतीनं उचललं धक्कादायक पाऊल

हेही वाचा- पुलकित सम्राट-क्रिती खरबंदा ‘या’ दिवशी बांधणार लग्नगाठ? अभिनेत्रीच्या ‘त्या’ पोस्टने चर्चांना उधाण

मिळालेल्या माहितीनुसार, ‘धर्मेंद्र ईशा व भरत तख्तानी यांच्या वेगळे होण्याच्या विरोधात नाहीत, पण ईशाने तिच्या निर्णयावर पुनर्विचार करावा अशी त्यांची इच्छा आहे. ईशा आणि भरत दोघेही धर्मेंद्र यांचा खूप आदर करतात. भरत देओल कुटुंबासाठी मुलासारखा आहे, तर ईशा नेहमी आनंदी राहावी अशी धर्मेंद्र यांची इच्छा आहे. मात्र, घटस्फोटाचा परिणाम ईशा आणि भरतच्या मुलींवरही होईल, त्यामुळेच त्यांनी त्यांच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी धर्मेंद्र यांची इच्छा आहे.

एवढंच नाही तर मुलींसाठी जर हे लग्न वाचवता आलं तर ईशा व भरत यांनी आपला घटस्फोटाचा निर्णय मागे घ्यावा, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. तर घटस्फोटाच्या ईशाच्या या निर्णयानंतर हेमा मालिनी लेकीच्या पाठिशी खंबीरपणे उभ्या आहेत. अद्याप त्यांनी या प्रकरणावर कोणतेही भाष्य केले नसले तरी ईशाच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करणार नसल्याचे त्यांनी स्प्ष्ट केले आहे.

हेही वाचा- भारतात नव्हे, ‘या’ देशात होणार अनुष्का-विराटच्या दुसऱ्या बाळाचा जन्म? हर्ष गोयंका यांच्या ‘त्या’ पोस्टमुळे चर्चांना उधाण

ईशा देओलने २९ जून २०१२ रोजी बिझनेसमन भरत तख्तानीशी लग्नगाठ बांधली. ईशा व भरत यांना राध्या व मिराया नावाच्या दोन मुली आहेत. अनेकदा ईशा आपला पती व मुलींबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दोघे एकत्र दिसले नाहीत. तसेच गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात हेमा मालिनी यांच्या वाढदिवसानिमित्त एका भव्य पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत कुटुंबातील जवळपास सर्वच सदस्य सहभागी झाले होते, पण या पार्टीत ईशाचा पती भरत तख्तानी दिसला नाही. त्यामुळे ईशा व भरत यांच्यात काहीतरी बिनसल्याच्या चर्चांना उधाण आले होते.

Story img Loader