‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात आलिया भट्ट व रणवीर सिंह मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटात जया बच्चन, शबाना आझमी व धर्मेंद्र यांच्यासारखे दिग्गजही होते. सिनेमा प्रदर्शित झाल्यावर धर्मेंद्र व शबाना आझमी यांच्या किसिंग सीनची जोरदार चर्चा झाली होती. आता दुर्गा पूजा पंडालमध्ये त्यांनी माध्यमांशी बोलताना त्या किसिंग सीनबद्दल त्यांचं मत व्यक्त केलं आहे.
शबाना आझमी व पती धर्मेंद्र यांच्या किसिंग सीनबाबत हेमा मालिनी म्हणाल्या, “धरमजींना नेहमी…”
शबाना आझमीबरोबरच्या त्या किसिंग सीनची तुलना धर्मेंद्र यांनी त्यांचा नातू राजवीर देओलच्या पहिल्याच चित्रपटातील किसिंग सीनशी तुलना केली. धर्मेंद्र म्हणाले, “प्रेक्षकांशी कनेक्ट होण्यासाठी चित्रपट हे आमचे माध्यम आहे. मी अशा भूमिका निवडतो ज्या माझ्या मनाला स्पर्श करतात. माझ्या नातवाने त्याच्या चित्रपटात किती किस केले हे मला माहीत नाही, पण माझ्या फक्त एका किसची इतकी चर्चा झाली.”
दरम्यान, सनी देओलचा धाकटा मुलगा राजवीर देओलने ‘दोनों’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. यामध्ये त्याच्याबरोबर पूनम ढिल्लों यांची मुलगी पलोमाही मुख्य भूमिकेत होती. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी होऊ शकला नाही. राजवीर व पलोमाचा पदार्पणाचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आदळला.
१६ ऑक्टोबर रोजी धर्मेंद्र यांच्या पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांचा ७५ वा वाढदिवस होता. त्यादिवशी चाहत्यांकडून मिळालेल्या प्रेमाबद्दल धर्मेंद्र यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. “आम्हाला सर्वांचे खूप प्रेम आणि आशीर्वाद मिळाले ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. तो आनंदाचा प्रसंग होता. मी माझा वाढदिवस साजरा करत नाही. मला कधी कधी वाटतं की मला माझ्या वाढदिवसाची तारीखदेखील लक्षात राहू नये.”