बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते धमेंद्र व अभिनेता सनी देओलचा मुलगा करण देओलचं लग्न १८ जून रोजी मोठ्या थाटामाटात पार पडलं. या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहेत. करण व द्रिशाच्या लग्नात तसेच रिसेप्शनला अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली. पण, करणच्या लग्नाला तसेच इतर कार्यक्रमांना हेमा मालिनी व त्यांच्या मुली उपस्थित नव्हत्या.
कोकणातील गावी पोहोचला भाऊ कदम, कौलारू घरातील लाकडी फळीवर लिहिलेली ‘ती’ दोन वाक्ये चर्चेत
सनी व बॉबी धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीची मुलं आहेत. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव प्रकाश कौर आहे. नातू करणच्या लग्नात धर्मेंद्र व प्रकाश कौर यांनी फोटोसाठी एकत्र पोज दिल्या. करणने त्यांचे फॅमिली फोटो शेअर केल्यावर ते सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये प्रकाश कौर व धर्मेंद्र, पूजा व सनी देओल पोज देताना दिसत आहेत. करणच्या लग्नातील या फोटोंमध्ये बऱ्याच वर्षांनी पूजा देओलही दिसली.
फोटोंमध्ये आचार्य व देओल कुटुंबीय पोज देताना दिसत आहेत. यामध्ये धर्मेंद्र व प्रकाश कौर यांचा फोटो पाहून नेटकरीही कमेंट्स करत आहेत. पहिल्यांदाच धर्मेंद्र त्यांच्या पहिल्या पत्नीबरोबर दिसले, असं ते म्हणत आहेत. याशिवाय बऱ्याच वर्षांनी सनी देओलची पत्नी पूजाचे फोटोही चाहत्यांना पाहायला मिळाले.