रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या ‘अॅनिमल’ चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या टीझरमध्ये रणबीर कपूरची जबरदस्त अॅक्शन आणि हिंस्त्र रुप पाहायला मिळालं. त्याबरोबरच यात रश्मिका मंदानाचीही महत्त्वाची भूमिका आहे. अडीच मिनिटांच्या या टीझरमध्ये रणबीर कपूर आणि इतर सेलिब्रिटी दिसतात, पण शेवटच्या काही सेंकदात बॉबी देओल येतो आणि भाव खाऊन जातो.
“विवेक अग्निहोत्रीने नशेत माझ्याबरोबर…”, महिलेचा आरोप; कंगना रणौत उत्तर देत म्हणाली, “मला बरबाद…”
वाढलेली दाढी आणि अंगावर शर्ट असलेल्या बॉबीचा लक्ष वेधून घेणारा लूक टीझरच्या शेवटी दिसतो, तिथेच टीझर संपतो. आता बॉबीचा टीझरमधील हाच व्हिडीओ शेअर करत धर्मेंद्र यांनी त्याच्या लूकवर प्रतिक्रिया दिली आहे. धर्मेंद्र ‘अॅनिमल’मधील बॉबीचा लूक व्हिडीओ शेअर करत “‘अॅनिमल’मध्ये माझा निरागस मुलगा” असं कॅप्शन दिलं आहे. त्यांनी शेअर केलेला व्हिडीओ देखील एडिटेड आहे. त्यावर “तुम्ही सर्वांनी १ डिसेंबरला थिएटरमध्ये यायचं, नाहीतर…” असं लिहिलं आहे.
दरम्यान, ‘अॅनिमल’ चित्रपट १ डिसेंबर रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. रणबीर कपूरच्या या चित्रपटाची मागच्या अनेका काळापासून जोरदार चर्चा होती. अखेर त्याचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे व प्रदर्शनाची तारीखही ठरली आहे. या चित्रपटात अनिल कपूर, रश्मिका मंदाना, परिणीती चोप्रा, बॉबी देओल, सौरभ शुक्ला दिसणार आहेत. चित्रपट हिंदी, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि तामिळ अशा पाच भाषेत प्रदर्शित होईल.