करण जोहरच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ मधील धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्यातील लिपलॉक सीनची बरीच चर्चा सुरू आहे. ८७ वर्षीय धर्मेंद्र यांना ७२ वर्षीय शबाना आझमीसोबत किसिंग सीन करताना पाहून काही प्रेक्षक चक्रावले आहेत आणि त्यांनी सोशल मीडियानिशाणाच्या माध्यमातून धर्मेंद्र यांच्यावर टीका केली आहे. लिपलॉकवरून झालेल्या गदारोळावर नुकतीच धर्मेंद्र यांची प्रतिक्रिया आली आहे.

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटातून करण जोहर ७-८ वर्षांनी दिग्दर्शनात परतला आहे. या मल्टीस्टारर चित्रपटात रणवीर सिंग आणि आलिया भट्टपासून ते धर्मेंद्र, शबाना आझमी आणि जया बच्चनपर्यंतच्या दिग्गज कलाकारही आपल्याला बघायला मिळतील. प्रेक्षकांना हा चित्रपट चांगलाच पसंत पडला आहे, पण धर्मेंद्र आणि शबाना आझमीचा किसिंग सीन पाहून लोक हैराण झाले आहेत.

आणखी वाचा : Rocky aur Rani ki Prem Kahaani Review : रणवीर-आलियाची जबरदस्त केमिस्ट्री पण…, कसा आहे ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’?

‘न्यूज १८’शी संवाद साधताना नुकतंच धर्मेंद्र यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “मी आणि शबानाच्या किसिंग सीनमुळे प्रेक्षक हैराण झाल्याचं मी ऐकलं आहे. तर काही लोकांनी याचे कौतुकही केले आहे. मला वाटते की लोकांना असे काही पाहायला मिळेल अशी अपेक्षा नव्हती. गेल्या वेळी मी ‘लाइफ इन अ मेट्रो’मध्ये नफिसा अलीबरोबरही किसिंग सीन दिला होता. त्यावेळी लोकांनी त्याचे कौतुक केले होते.”

धर्मेंद्र पुढे म्हणाले, ‘करणने जेव्हा आम्हाला हा सीन सांगितला तेव्हा मी खूप उत्साहित होतो. हा सीन चित्रपटासाठी महत्त्वाचा आहे हे आम्हाला समजले अन् आम्ही यासाठी होकार दिला. तसेच, माझा विश्वास आहे की रोमान्सला वयाची मर्यादा नसते. वय हा एक फक्त आकडा आहे. हा सीन देताना मला आणि शबानालाही अजिबात संकोच वाटला नाही, अत्यंत सुंदर पद्धतीने हा सीन शूट करण्यात आला आहे.” २८ जुलैला प्रदर्शित झालेल्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ने पहिल्याच दिवशी ११.५ कोटींची कमाई केली आहे.

Story img Loader