दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचा नातू आणि अभिनेता सनी देओलचा मुलगा करण देओलने १८ जून २०२३ रोजी द्रिशा आचार्यबरोबर लग्नगाठ बांधली. करण-द्रिशाच्या रिसेप्शनला अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. करणच्या रिसेप्शनमधील धर्मेंद्र यांचा कविता म्हणतानाचा खास व्हिडीओ अभिनेते अनुपम खेर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.
हेही वाचा : अजय देवगण नव्हे तर बॉलीवूडच्या ‘या’ अभिनेत्याचे केले काजोलने कौतुक; म्हणाली “तो पूर्ण काळजी…”
अनुपम खेर यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये धर्मेंद्र एक कविता म्हणताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सुंदर कॅप्शन देत अनुपम खेर यांनी लिहिले आहे की, “जेव्हा आयुष्यात आपण मोठे होते. तेव्हा आपल्याला बालपणीच्या आपल्या जुन्या घराची खूप आठवण येते. अलीकडेच संपन्न झालेल्या सनी देओलच्या मुलाच्या रिसेप्शनला मी थोडासा लवकर पोहोचलो होतो. या वेळी माझी आणि धर्मेंद्रजी यांची भेट झाली. त्यांच्याबरोबर मला थोडासा वेळ घालवता आला. धरमजींनी मला आणि राज बब्बरला त्यांनी स्वत: लिहिलेली कविता ऐकवली. या सुंदर कवितेचा व्हिडीओ बनवण्यासाठी मी धरमजींना खूप विनंती केली. ही कविता नक्की ऐका तुम्हाला सुद्धा तुमचे घर, तुमचे बालपण आणि तुमच्या आईची आठवण येईल. धरमजी खूप खूप धन्यवाद”
हेही वाचा : “सेटवरचा एक दिवा विझला अन्…”, मराठमोळ्या अभिनेत्याने सांगितला ‘रामलीला’ चित्रपटाच्या शूटिंगचा किस्सा
अभिनेते अनुपम खेर यांनी करण-द्रिशाच्या लग्नातील अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आमिर खान, सलमान खान आणि सनी देओलबरोबर काढलेला सुंदर फोटो शेअर करीत त्यांनी कॅप्शनमध्ये ‘क्लास ऑफ 90s, जेव्हा आम्ही मोबाइल फोन, व्हॅनिटी व्हॅन्स आणि एकमेकांबरोबर जीवनातील अनेक किस्से आणि मेकअप रुम शेअर करायचो’ असे लिहिले आहे.
दरम्यान, करण-द्रिशा गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करीत होते. १८ जूनला दुपारी दोघेही विवाहबंधनात अडकले. करण देओलने २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. लवकरच करण ‘अपने २’ या चित्रपटात भूमिका साकारणार आहे.