बॉलिवूड कलाकार व त्यांच्या हाऊस पार्टीची सोशल मीडियावर कायमच चर्चा रंगताना दिसते. पार्टीदरम्यानचे अनेक व्हिडीओ व फोटोही व्हायरल होताना दिसतात. आता असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचा हा व्हिडीओ आहे. सध्या ते कलाक्षेत्रापासून दूर असले तरी सोशल मीडियावर बरेच सक्रिय असतात. त्यांनी त्यांच्या फार्महाऊसवरील मित्रांबरोबरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
धर्मेंद्र सध्या त्यांच्या फार्महाऊसवर राहत आहेत. तिथे राहून ते शेतीही करतात. यादरम्यानचे काही व्हिडीओ त्यांनी स्वतः शेअर केले होते. धर्मेंद्र यांच्या फार्महाऊसवर त्यांचा मित्र परिवार पोहोचला होता. त्यांनी मित्रांसाठी खास पार्टीचं आयोजन केलं होतं. ही खरं तर दारू पार्टी होती. धर्मेंद्र यांनी स्वतः या पार्टीचा व्हिडीओ शूट केला आहे.
धर्मेंद्र यांचा व्हिडीओ
त्यांनी मित्र दारू पार्टी करत असतानाचा व्हिडीओ ट्वीट केला. हा व्हिडीओ ट्वीट करत असताना त्यांनी म्हटलं की, “माझे हे खोडकर मित्र मला भेटण्यासाठी माझ्या फार्महाऊसवर आले होते”. धर्मेंद्र यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्यांच्या मित्राच्या हातामध्ये दारूचे ग्लास पाहायला मिळत आहेत. तसेच धर्मेंद्र यांचा मित्र त्यांच्याबाबत बोलताना दिसत आहे.
धर्मेंद्र यांनी शेअर केलेल्या व्हिडीओद्वारे त्यांच्या फार्महाऊसवर जोरदार दारू पार्टी झाली असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मात्र स्वतः धर्मेंद्र यांना दारूचं व्यसन नाही. २०१३मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत दारू सोडली असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. “दारूच्या व्यसनामुळे याआधी एक अभिनेता म्हणून मी स्वतःला गमावलं होतं. म्हणून मी आता दारू पीत नाही”. असं धर्मेंद्र यांनी म्हटलं होतं.