बॉलिवूडचा ‘ही-मॅन’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते म्हणजे धर्मेंद्र (Dharmendra). आपल्या करिअरच्या सुरुवातीपासूनच जबरदस्त व्यक्तिमत्त्व आणि अभिनयासाठी धर्मेंद्र प्रसिद्ध आहेत. आपल्या अभिनयाने त्यांनी गेली दोन दशके प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. आजवर अनेक सुपरहिट चित्रपटांमधून ते प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. अभिनयाने चर्चेत राहणारे धर्मेंद्र सोशल मीडियाद्वारेही चर्चेत राहत असतात.
सोशल मीडियाद्वारे ते त्यांचे अनेक फोटो व व्हिडीओ चाहत्यांपर्यंत पोहोचवतात. शिवाय चाहत्यांनाही त्यांच्याबद्दल जाणून घेण्यात रस असतो. अशातच आता सोशल मीडियावर धर्मेंद्र यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. Viral Bhayani या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे धर्मेंद्र यांचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे आणि या व्हिडीओमध्ये धर्मेंद्र यांच्या डोळ्याला दुखापत झाल्याचे दिसत आहे.
सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या धर्मेंद्र यांच्या व्हिडीओमध्ये त्यांच्या डोळ्याला पट्टी बांधल्याचे दिसत आहे. त्यामुळे अनेक चाहत्यांनी त्यांच्या तब्येतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. मात्र धर्मेंद्र यांनी स्वत: आपण ठीक असल्याचे चाहत्यांना सांगितलं आहे. सोशल मिडियावर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओमधून त्यांनी चाहत्यांना काळजी करु नये असं आवाहन चाहत्यांना केलं आहे.
Viral Bhayani इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये धर्मेंद्र डोळ्यांच्या क्लिनिकमधून बाहेर येत आहेत आणि बाहेर येताच पापाराझी त्यांच्या तब्येतीची विचारपुर करतात. तेव्हा धर्मेंद्र सर्व पापाराझीना “मी स्ट्रॉंग आहे” असं मोजक्या शब्दांत उत्तर देतात. तसंच मी अजूनही माझ्या तब्येतीची काळजी घेतो असं म्हणतात. यानंतर ते त्यांच्या सर्व चाहत्यांना धन्यवाददेखील म्हणतात.
Viral Bhayani शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये धर्मेंद्र यांच्या डोळ्यावर पूर्णपणे पट्टी बांधलेली आहे दिसत आहे. त्यावरून त्यांच्या डोळ्याला झालेली इजा ही गंभीर असल्याचं लक्षात येत आहे. पण ही दुखापत नक्की कशामुळे झाली याबद्दलचं नेमकं कारण समोर आलेलं नाही. पण स्वत: धर्मेंद्र यांनी काळजी न करण्याबद्दल सांगितलं आहे.
दरम्यान, १९६० मध्ये ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात प्रवेश करणारे धर्मेंद्र शेवटचे २०२४ मध्ये शाहिद कपूर आणि कृती सेनन यांच्या ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ या चित्रपटात दिसले होते. त्यानंतर आता ते या वर्षी प्रदर्शित होणाऱ्या ‘इक्किस’ या चित्रपटात दिसणार असल्याचे म्हटलं जात आहे.