बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचा नातू व सनी देओलचा मुलगा करण १८ जून रोजी विवाहबंधनात अडकणार आहे. त्याच्या लग्नापूर्वीचे समारंभ सुरू आहेत. शुक्रवारी १६ जून रोजी करण व द्रिशाचा संगीत समारंभ झाला. या कार्यक्रमाला अनेक बॉलिवूड कलाकारांबरोबर धर्मेंद्र यांनीही हजेरी लावली.

करण देओल व द्रिशा आचार्यच्या संगीत समारंभाला रणवीर सिंगने हजेरी लावली. त्याने सनी देओलला मिठी मारून मुलाच्या लग्नासाठी शुभेच्छा दिल्या.

धर्मेंद्र यांनी नातवाच्या संगीत समारंभाला फक्त हजेरीच लावली नाही, तर डान्सही केला. धर्मेंद्र यांनी नातू करण व राजवीरबरोबर ‘यमला पगला दिवाना’ या गाण्यावर ठेका धरला. त्यांच्या डान्सला व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

सनी देओलने करणच्या संगीत कार्यक्रमासाठी ‘गदर’मधील तारा सिंगसारखा लूक केला होता. याच चित्रपटातील गाण्यांवर त्याने डान्स केला.

रणवीर सिंगची बहीण रितिका भावनानीदेखील या कार्यक्रमाला पोहोचली. ती खूपच सुंदर दिसत होती.

नवरदेव करणनेही त्याच्या संगीत समारंभात डान्स केला.

करण व द्रिशाने संगीत समारंभासाठी ट्विनिंग केलं होतं. द्रिशा व करण इंडो वेस्टर्न कपड्यांमध्ये खूपच सुंदर दिसत होते.

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून द्रिशा व करणच्या लग्नाची तयारी सुरू होती. उद्या १८ जून रोजी दोघेही लग्नबंधनात अडकणार आहेत.

Story img Loader