१९७३ मध्ये प्रदर्शित झालेला अमिताभ बच्चन यांचा ‘जंजीर’ हा चित्रपट खूप गाजला. या चित्रपटामध्ये त्यांनी साकारलेल्या पात्राचे नाव विजय असे होते. हे नाव त्याच्यासाठी लकी ठरले. ‘जंजीर’ हा चित्रपट अमिताभ यांच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरला. या चित्रपटापासून बॉलिवूडमध्ये त्यांची अँग्री यंग मॅन अशी प्रतिमा तयार झाली. सलीम-जावेद या जोडीने चित्रपटाची कथा आणि संवाद लिहिले होते, तर प्रकाश मेहरा यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता.
या चित्रपटाबद्दलचा किस्सा सांगताना जावेद अख्तर यांनी ‘जंजीरची स्क्रिप्ट आम्ही धर्मंद्र यांच्यासाठी लिहिली होती. पण काही कारणांमुळे त्यांनी चित्रपटामध्ये काम करायला नकार दिला. आम्ही अमिताभ बच्चन यांच्याकडे शेवटचा पर्याय म्हणून पाहत होतो’ असे म्हटले. ते पुढे म्हणाले, “तेव्हा प्रकाश मेहता पहिल्यांदा चित्रपटाची निर्मिती करत होते. त्यांच्याजवळ स्क्रिप्ट होती, पण मुख्य नायक नव्हता. त्यांनी तेव्हाच्या अनेक दिग्गज अभिनेत्यांना चित्रपटामध्ये काम करायची ऑफर दिली. पण कोणीही काम करायला होकार दिला नाही. चित्रपटातला नायक हा फार गंभीर असल्याने त्यांनी चित्रपट करणे टाळले.”
आणखी वाचा – उद्धव ठाकरेंना ‘धगधगती मशाल’ चिन्ह मिळाल्यानंतर आदेश बांदेकरांनी शेअर केला जुना व्हिडीओ
त्यांच्या या वक्तव्याला धर्मंद्र यांनी प्रत्युत्तर दिले आहे. जावेद यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावत त्यांनी “जावेद कसा आहेस? दिखाव्याच्या या दुनियेमध्ये बऱ्याच वेळा वास्तव मागे पडते. मला लोकांना हसवायला चांगले जमते. मनामध्ये येणारा प्रत्येक विचार मी बोलू शकलो असतो तर किती बरं झालं असतं ना,” अशी कमेंट केली आहे.
‘जंजीर’ चित्रपटामध्ये अमिताभ यांच्यासह जया बच्चन, प्राण, ओम प्रकाश, अजित खान अशा तगड्या कलाकारांनी काम केले आहे. कल्याणजी-आनंदजी यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे. २०१३ मध्ये या चित्रपटाच्या रिमेक तयार करण्यात आला होता. या रिमेकद्वारे दाक्षिणात्य सुपरस्टार रामचरणने बॉलिवूड केले होते.