बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून धीरेंद्र कृष्ण महाराज यांना चमत्कार सिद्ध करण्याचं आव्हान देण्यात आलं होतं. तेव्हापासून धीरेंद्र महाराज चर्चेत आले आहेत. शाहरुख खानच्या पठाणबाबतही धीरेंद्र महाराजांनी वक्तव्य केलं होतं.
शाहरुख खानच्या पठाण चित्रपटातील बेशरम रंग गाण्यामुळे वादंग निर्माण झाला होता. या गाण्यात बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने भगव्या रंगाची बिकीनी परिधान करत रोमान्स केल्याने हिंदू संघटना, बजरंग दल व विश्व हिंदू परिषद या संघटनांकडून बेशरम रंगला विरोध केला गेला होता. हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप केल्याचं या संघटनांचं म्हणणं होतं. त्याच दरम्यान, धीरेंद्र शास्त्री महाराजांनीही पठाण चित्रपट न पाहण्याचं आवाहन त्यांच्या प्रवचनातून केलं होतं.
हेही वाचा>> धीरेंद्र शास्त्री महाराजांमुळे चर्चेत आलेल्या सुहानी शाह कोण आहेत? अनेक सेलिब्रिटीही करतात फॉलो
“देशातील सगळ्या नागरिकांना शपथ आहे, सनातनी विरोधी लोक मग तो नेता असो वा अभिनेता. एक चित्रपट बॉयकॉट केला तर टिळा लावायला सुरुवात केली. खान आडनाव असलेलेही वैष्णोदेवीच्या मंदिरात जाऊ लागले. हा चित्रपट न बघण्याची आज शपथ घ्या”, असं धीरेंद्र महाराज म्हणाले होते.
हेही वाचा>> रितेश देशमुखलाही पडली शाहरुख खानच्या ‘पठाण’ची भूरळ; चित्रपटाचं तिकीटही केलं बुक, ट्वीट करत म्हणाला…
धीरेंद्र महाराजांनी काही दिवसांपूर्वी एबीपी न्यूजला मुलाखत दिली होती. यावेळीही त्यांनी बेशरम रंगबाबत वक्तव्य केलं होतं. “पठाण चित्रपट किंवा त्या नावाशी मला काही घेणं देणं नाही. पण भगवाच रंग बेशरम रंग का? हिरवा रंग बेशरम का नाही?”, असं ते म्हणाले होते. “चित्रपटातून नेहमी सनातनी हिंदूंना टार्गेट केलं जातं. चित्रपट हे अनेक दशके तसेच राहतात. म्हणून पठाण चित्रपटाला विरोध करत आहे”, असंही ते म्हणाले होते.