Dhirubhai Ambani International School Fee Structure: जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक म्हणजेच शाहरुख खानची तिन्ही मुलं म्हणजेच सुहाना खान, आर्यन खान आणि अबराम खान यांनी मुंबईच्या धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेत आपले शिक्षण घेतले आहे. तसंच भारतीय क्रिकेट कर्णधार रोहित शर्माची लेक, महानायक अमिताभ बच्चन यांची नात असे अनेक स्टार किड्स याच शाळेत शिकत आहेत. अलीकडेच धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलचा वार्षिक स्नेहसंलेनाचा कार्यक्रम पार पडला. यामध्ये आराध्याने केलेले नाटक, अबराम आणि तैमूरचे सादरीकरण, तसेच नीता अंबानी यांचा शाळेच्या स्नेहसंमेलनातील लुक अशा अनेक क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अमिताभ बच्चन यांची नातीच्या सादरीकरणावर प्रतिक्रिया तर अनेकांनी डोक्यावर घेतली आहे. मात्र या सगळ्या चर्चांमध्ये एक प्रश्न नेटकऱ्यांकडून वारंवार विचारला जात आहे तो म्हणजे बाबा रे या शाळेची फी किती असेल?
धीरूभाई अंबानी शाळेची फी किती?
धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलच्या फी च्या रचनेबाबत आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. अन्य शाळांप्रमाणे इयत्तेनुसार प्रत्येक वर्गाची फी वाढत जाते. साधारण केजी (शिशुवर्ग) ते इयत्ता सातवी पर्यंत प्रत्येक वर्षाची फी ही १ लाख ७० हजाराच्या घरात आहे. याची मासिक आकडेवारी पाहिल्यास महिन्याला १४ हजार रुपये अशी फी आहे. तर इयत्ता आठवीनंतर फी वाढून ५. ९ लाखापर्यंत पोहोचते. आठवी ते दहावी अशा तीन वर्षांसाठी प्रत्येक वर्षी साधारण ५.९ लाख रुपये फी आकारली जाते. तर याच शाळेत ११ वी १२ वी म्हणजेच ज्युनिअर कॉलेजचे शिक्षण सुद्धा दिले जाते. ज्यासाठी वर्षाला साधार ९. ६५ लाख रुपये फी आहे.
धीरूभाई अंबानी शाळेतील सुविधा
धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल ही भारतातील आघाडीच्या शाळांपैकी एक मानली जाते. मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी २००३ मध्ये याची स्थापना केली होती. १ लाख ३० हजार चौरस फूट पसरलेली आहे आणि ती सात मजली इमारत सुसज्ज वर्गखोल्या, खेळाचे मैदान, इंटरनेट सुविधा, एसी क्लासरूम, टेरेस गार्डन आणि टेनिस कोर्ट अशा आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि आर्थिक मदत देखील केली जाते.
धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल मध्ये विद्यार्थ्यांना दोन वर्षांचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील डिप्लोमा प्रोग्राम (IBDP) चे शिक्षण दिले जाते. हे केंब्रिज असेसमेंट इंटरनॅशनल एज्युकेशन (CAIE) आणि काउन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (CISCE) शी संलग्न आहे.
हे ही वाचा<< Video: CSK सोडून RCB मध्ये जाण्याच्या विनंतीवर धोनीचं शंभर नंबरी उत्तर; म्हणाला, “इथे माझ्यासमोर काळजी..”
दरम्यान, आमिर खान आणि किरण राव यांचा मुलगा आझाद राव खान सध्या शाळेत शिकत आहे. बहुतेक वेळा त्याचे शालेय गणवेशातील फोटो व्हायरल होतात. २०१८ मध्ये, एका नाटकासाठी आराध्या राय बच्चन आणि आझाद राव खान यांचे देवी सीता आणि भगवान राम यांच्या आपापल्या पोशाखातील फोटो व्हायरल झाले होते. संजय कपूर आणि महीप कपूर यांचा मुलगा जहाँ कपूर देखील सध्या धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकत आहे. तर यापूर्वी अनन्या पांडे, सारा अली खान यांसारख्या स्टार किड्सने सुद्धा याच शाळेतून शिक्षण घेतले आहे.