सध्या बॉलीवूडमध्ये अभिनेत्रींना महत्वाचे स्थान आहे. ९० च्या दशकातील चित्रपटांच्या तुलनेत त्यांना स्क्रीनवर अधिक वेळही मिळत असल्याचे दिसते. बॉलीवूडमधील अभिनेत्री वर्चस्व गाजवताना दिसत आहेत. मात्र, एक काळ असा होता, जेव्हा अभिनेत्रींना गप्प बसवले जात असे, अभिनेत्री दिया मिर्झा(Dia Mirza)ने म्हटले आहे. अभिनेत्रीने एका मुलाखतीत सलमान खान(Salman Khan)ची प्रमुख भूमिका असलेल्या ‘तुमको ना भूल पाएँगे’ या चित्रपटात काम करताना काय अनुभव आला होता, याबद्दल वक्तव्य केले आहे.

‘तुमको ना भूल पाएँगे’ या चित्रपटाचे…

अभिनेत्री दिया मिर्झाने नुकतीच झूमला मुलाखत दिली. या मुलाखतीत पूर्वी बॉलीवूडमध्ये अभिनेत्रींसाठी काम करण्यासाठी कसे वातावरण होते? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना अभिनेत्रीने म्हटले, “बऱ्याचदा असे व्हायचे की तुमच्या पुरूष सहकलाकाराच्या कोणत्या तारखांना शूट होऊ शकते, यानुसार शूटिंग व्हायचे. त्यांना कोणते ठिकाण योग्य वाटते, त्याचा विचार केला जायचा. हे आतासुद्धा होते. पण जर तुम्हाला पटकथा माहित असेल, त्यातून मार्ग काढणे सोपे आहे. त्यावेळी आम्हाला काहीच माहित नसायचे.”

पुढे दिया मिर्झाने ‘तुमको ना भूल पाएँगे’ या चित्रपटाचे उदाहरण देत स्पष्ट केले की हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात उत्तम टीमबरोबर काम करत असूनही महिला कलाकारांकडे दुर्लक्ष केले जायचे. अभिनेत्रीने म्हटले, “तुमको ना भूल पाएँगे या चित्रपटाचे दिग्दर्शक पंकज पाराशर हे होते. त्यांनी त्याआधी चालबाज चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. सलमान खान मुख्य भूमिकेत होता. चित्रपटाचे निर्मातेही प्रसिद्ध होते. त्यामुळे त्या चित्रपटाचा भाग असल्याबद्दल मला छान वाटत होते. पटकथेतील सर्व गोष्टी व्यवस्थित असाव्यात, यासाठी त्यांनी खूप खर्च केला. पण स्क्रीप्ट उपलब्ध नव्हती. कोणतेही वर्कशॉप झाले नाहीत. रीडिंग झाले नाहीत. सीन्स भोजपूरीमध्ये लिहिले होते. मी जी भूमिका साकारत होते, ती मुलगी राजस्थानची होती आणि भोजपूरीमध्ये बोलत होती. मला जे संवाद बोलायचे होते, ते शूटिंग सुरू होण्याच्या काही वेळ आधी दिले होते.”

जेव्हा दियाने तिच्या पात्राबद्दल प्रश्न विचारले. तेव्हा तिला उत्तर देणे टाळले गेले. अभिनेत्रीने म्हटले, “मी जेव्हा त्यांना माझ्या भूमिकेबद्दल विचारले तेव्हा त्यांनी मला तू खूप प्रश्न विचारतेस. हे करू नकोस. तुला जितकं सांगितलं आहे, तितकंच कर. असे म्हणत मला टाळले”, असा अनुभव अभिनेत्रीने सांगितला. ती पुढे म्हणाली, “स्त्रीयांचा ज्या पद्धतीने अनादर केला गेला, त्याचा मला त्रास झाला. त्यांना चांगल्या पद्धतीने जाणून घेण्यासाठी तिला प्रश्न विचारण्याची परवानगी द्या.”

दिया मिर्झाच्या कामाबद्दल बोलायचे तर अभिनेत्री नुकतीच ‘नादानियाँ’ मध्ये दिसली होती. या चित्रपटात इब्राहिम अली खानचा आणि खुशी कपूर देखील मुख्य भूमिकेत आहे.