अभिनेत्री दिया मिर्झाने साहिल संघाशी लग्न केलं होतं. २०१४ मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली आणि पाच वर्षांनी २०१९ मध्ये ते विभक्त झाले. त्यानंतर दोन वर्षांनी दियाने एका खासगी समारंभात बिझनेसमन वैभव रेखीशी लग्न केलं. वैभवही घटस्फोटित होता व त्याला मुलगी समायरा होती. वैभवशी लग्न केल्यावर दिया समायराची सावत्र आई झाली. दिया सोशल मीडियावर फॅमिली फोटो शेअर करत असते, त्या फोटोत समायरादेखील असते. आता एका मुलाखतीत समायरा आपल्याला आई म्हणत नसल्याचा खुलासा दियाने केला आहे.

‘न्यूज १८’ मातृदिनानिमित्त दिलेल्या एका खास मुलाखतीत दियाने आपल्या सावत्र लेकीबद्दल भाष्य केलं. समायराने अद्याप आपल्याला ‘मा’ किंवा ‘मम्मा’ असं कधीच म्हटलं नसून तिने तसं म्हणावं अशी अपेक्षाही नसल्याचं दियाने नमूद केलं. अभिनेत्रीला समायरा दिया नावानेच हाक मारते, असंही तिने सांगितलं. “तिने मला ‘मा’ म्हटले नाही. तिने मला ‘मा’, ‘मम्मा’ किंवा ‘आई’ म्हणावं अशी कोणतीही अपेक्षा नाही. तिला एक आई आहे जिला ती ‘मम्मा’ किंवा ‘मॉम’ म्हणते. ती मला ‘दिया’ म्हणते,” असं अभिनेत्री म्हणाली.

Supreme Court on maternity leave
दत्तक मूल तीन महिन्यांपेक्षा मोठे असल्याने मातृत्व रजा नाकारली ; सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडे मागितले उत्तर
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Shruti Haasan With Parents
“लोक माझ्याकडे बोट दाखवायचे अन्…”, प्रसिद्ध अभिनेत्री घटस्फोटित आई-वडिलांना म्हणाली ‘हट्टी’
Aasiya Kazi Gulshan Nain Wedding date
८ वर्षांचं प्रेम, कुटुंबियांचा विरोध अन्…; ‘ही’ लोकप्रिय मुस्लीम अभिनेत्री ‘या’ दिवशी करणार आंतरधर्मीय लग्न
Gym trainer ends life over dispute with boyfriend send video to mother don't leave him shocking Photo
PHOTO: सॉरी मम्मी चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडून चूक केली…त्याला सोडू नको” आईला शेवटचा मॅसेज करुन संपवलं आयुष्य
samantha want to be mother
अभिनेत्री समांथा रूथ प्रभूला व्हायचंय आई, इच्छा व्यक्त करत म्हणाली, “वयाचा विचार…”
Isha Koppikar first reaction on divorce with Timmy Narang
१४ वर्षांचा संसार मोडण्याचं कारण काय? पहिल्यांदाच बोलली ‘खल्लास गर्ल’; म्हणाली, “त्याने अत्यंत बेजबाबदारपणे…”

Video: माधुरी दीक्षितच्या मोठ्या बहिणीला पाहिलंत का? ‘तो’ खास व्हिडीओ पाहून अभिनेत्रीला अश्रू अनावर

दिया व वैभव यांना अव्यान नावाचा मुलगा आहे. कधी कधी अव्यान समायरा प्रमाणेच हाक मारतो, असं अभिनेत्रीने सांगितलं. तो समायराचं ऐकून मला ‘दिया मॉम’ म्हणतो, असं ती म्हणाली. “समायराचे आभार, कारण आता अव्यान देखील मला कधीतरी ‘दिया’ म्हणतो. कधीतरी तो ‘दिया मॉम’ म्हणतो, हे ऐकायला खूप मजेदार वाटतं.” असं दिया म्हणाली.

“होय, त्याने प्रीती झिंटाला डेट केलं होतं,” प्रसिद्ध अभिनेत्रीचा पतीबाबत खुलासा; म्हणाली, “मी त्या दोघांच्या…”

दियाने ती आठवण सांगितली जेव्हा अव्यानने तिला पहिल्यांदा मा म्हटलं होतं. “तो दिवस मी कधीच विसरणार नाही. तो खूप नंतर मला ‘मम्मा’ म्हणू लागला. तो शब्दांचे उच्चार करू लागल्यावर तीन महिन्यांनी मला मम्मा म्हणाला होता. तो एक खूप सुंदर क्षण होता. त्याने अचानक माझ्याकडे पाहिलं आणि मला मम्मा म्हटलं. ते ऐकून मला खूप आनंद झाला होता. त्यावेळी मी त्याला फुलपाखरांबरोबर खेळवत होते आणि माझे पती ते कॅमेऱ्यात रेकॉर्ड करत होते. त्याचवेळी अव्यान मला मम्मा म्हणाला आणि तो खास क्षण कॅमेऱ्यात कैद झाला. ते खूपच जादुई होतं,” असं दियाने सांगितलं.

“मला त्याबद्दल शून्य इंटरेस्ट…”, सुबोध भावे ‘त्या’ प्रश्नावर स्पष्टच बोलला; अभिनेत्याने पुण्यात केलं मतदान

दिया अनेकदा तिचा मुलगा अव्यानबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. दियाचा मुलगा तीन वर्षांचा आहे, त्याचा जन्म २०२१ मध्ये झाला.