प्रियांका चोप्रा ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेंत्रीपैकी एक आहे. अभिनयाच्या जोरावर प्रियांकाने बॉलिवूडमध्ये अल्पावधीतच स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. बॉलिवूडमधील कारकीर्दीत प्रियांकाचं काही अभिनेत्यांबरोबर जोडलं गेलं होतं. अभिनेता शाहिद कपूरबरोबर प्रियांकाच्या अफेयरच्या चर्चा होत्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०११ साली आयकर विभागाकडून प्रियांकाच्या घरी छापेमारी करण्यात आली होती. आयकर विभागाचे अधिकारी अभिनेत्रीच्या घरी पोहोचले तेव्हा शाहिद कपूरने दरवाजा उघडल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. एवढंच नव्हे तर, तेव्हा शाहिदच्या अंगावर फक्त टॉवेल असल्याचंही वृत्त होतं. याबाबत प्रियांकाने एका मुलाखतीत खुलासा केला होता. इंडिया टीव्हीच्या आपकी की अदालतमध्ये दिलेल्या मुलाखतीत प्रियांकाने या वृत्तावर संताप व्यक्त करत नेमकं काय घडलं ते सांगितलं होतं.

हेही वाचा>> ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेची आंबेडकर जयंतीनिमित्त खास पोस्ट, फोटो शेअर करत म्हणाला, “बाबासाहेब…”

“दरवाजा ठोठावल्यानंतर घरातील व्यक्ती दरवाजा उघडते. माझ्या घरात काम करणाऱ्या बाईने दरवाजा उघडला होता. परंतु, शाहिद कपूरने दरवाजा उघडला अशी अफवा सगळीकडे पसरवण्यात आली. मी एक मुलगी आहे. कोणत्याही मुलीबद्दल असं बोलणं, चुकीचं आहे. ज्या महिला व मुली इथे बसल्या आहेत. त्यांना माझ्या भावना समजत असतील. कोणतेही पुरावे नसताना आणि मुळात अशी गोष्ट झालेलीच नाही, त्याबाबत तुम्ही चुकीची माहिती कशी देऊ शकता? मी कोणाची तरी मुलगी व बहीण आहे,” असं प्रियांका म्हणाली होती.

हेही वाचा>> “मला वैभव तत्ववादी आवडायचा” प्राजक्ता माळीच्या ‘त्या’ वक्तव्यावर अभिनेत्याची प्रतिक्रिया, म्हणाला “तिने मला…”

प्रियाकांने घडलेल्या प्रसंगाचा घटनाक्रमही सांगितला होता. “मी माझ्या आईवडिलांबरोबर राहते. जेव्हा आयकर विभागाचे अधिकारी माझ्या घरी आले, तेव्हा माझी आई घरी नव्हती. माझ्या आजोबांच्या वर्षश्राद्धासाठी ती झारखंडला गेली होती. माझ्या वडिलांना सकाळी लवकर ऑफिसला जावं लागतं, म्हणून ते दुसऱ्या घरी होते. शाहिद कपूर माझ्या घरापासून फक्त ३ मिनिटांच्या अंतरावर राहतो. मी इतर कुणाला फोन केला असता, तर त्यांना यायला २०-२५ मिनिटे लागली असती. म्हणून मी शाहिदला फोन केला. आणि अधिकाऱ्यांनीही त्याला घरात थांबण्याची परवानगी दिली. या गोष्टीला मी कधीही नाकारलेलं नाही,” असंही पुढे प्रियांकाने सांगितलं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Did shahid kapoor in towel open door when it deparment raid at priyanka chopra house once actress revealed what happened at her home kak