शाहरुख खानच्या जवान या चित्रपटाची गेले अनेक महिने सर्वत्र प्रचंड चर्चा होती. अखेर ७ सप्टेंबर रोजी हा बहुप्रतीक्षित चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला सर्वत्र खूप उत्तम प्रतिसाद मिळत आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने ७२ कोटींची छप्परफाड कमाई केली. संपूर्ण भारतातच नव्हे तर जगभरातही या चित्रपटाची चांगलीच हवा आहे. जगभरात या चित्रपटाने ७०० कोटींचा टप्पा पार केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकतंच ‘जवान’च्या संपूर्ण टीमने मुंबईत एक कार्यक्रम आजोजित केला. यावेळी चित्रपटांच्या संपूर्ण टीमने त्यांच्या चाहत्यांशी अन् मीडियाशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. याचदरम्यान शाहरुखने त्याच्या आगामी ‘डंकी’ या चित्रपटाबद्दल मोठा खुलासा केला. राजकुमार हिरानी यांचा हा आगामी चित्रपट पुढे ढकलला जाणार अशी चर्चा गेले काही दिवस रंगली होती.

आणखी वाचा : सलमान खानच्या सुपरहीट चित्रपटांचे लेखक इकराम अख्तर यांना अटक; ‘इतक्या’ कोटींची फसवणुक केल्याचा आरोप

यावर खुद्द शाहरुखनेच उत्तर देत ‘डंकी’ याच वर्षी डिसेंबरच्या दरम्यान प्रदर्शित होणार असा खुलासा केला आहे. याबरोबरच शाहरुख खानने ‘जवान’च्या यशानंतर पुढील प्रोजेक्टसाठी मानधन वाढवल्याची चर्चाही कानावर पडली होती. नुकतंच शाहरुखच्या जवळच्या व्यक्तीने याबाबत खुलासा केला आहे.

शाहरुख मानधनाच्या बाबतीत अजिबात लालची नाही, त्याने कधीच चित्रपट फ्लॉप झाल्यावर त्याचं मानधन कमी केलं नाही किंवा चित्रपट सुपरहिट झाल्यावर मानधन वाढवलं नाही. असं शाहरुखच्या जवळच्या व्यक्तीने ‘इ-टाईम्स’शी संवाद साधताना स्पष्ट केलं. ‘जवान’ला मिळालेल्या यशानंतर प्रेक्षक शाहरुखच्या ‘डंकी’ची फार आतुरतेने वाट बघत आहेत. या चित्रपटात शाहरुख खानबरोबर तापसी पन्नू ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Did shahrukh khan increased his fees for dunki and future projects after jawan success avn