Raha Kapoor Cute Conversation with Grandma Neetu Kapoor: रणबीर कपूर व आलिया भट्ट यांची लाडकी लेक राहा लवकरच दोन वर्षांची होईल. सोशल मीडियावर सतत चर्चेत राहणाऱ्या काही सेलिब्रिटींच्या मुलांपैकी एक राहा होय. गोंडस राहाचे फोटो, व्हिडीओ खूप व्हायरल होतात. आता राहाचा नुकताच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये पहिल्यांदाच तिचा आवाज ऐकायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आलिया भट्ट (Alia Bhatt) व रणबीर कपूर (Ranbir Kapoor) लेक राहाबरोबर विमानतळावर पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाले. हे तिघेही विमानतळावर असताना तिथे रणबीरची आई नीतू कपूर आल्या. आजीला पाहताच राहा (Raha Kapoor Cute Video) खूप खूश झाली आणि पाहून टाळ्या वाजवू लागली. नीतू आल्यावर मुलगा व सूनेला भेटल्या, मग राहा आजीला म्हणाली, “दादी, सो मच.” त्यानंतर हे सर्वजण निघून गेले. आजीशी बोलणाऱ्या राहाचा हा व्हिडीओ फिल्मिज्ञान या पापाराझी अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा – प्रसिद्ध अभिनेत्रीच्या तीन महिन्यांच्या मुलाला पाहिलंत का? पहिल्यांदाच दाखवला मुलाचा चेहरा, पाहा खास Photos

पाहा राहा कपूरचा क्यूट व्हिडीओ –

राहाचा (Raha Kapoor Cute Video with Dadi) हा गोंडस व्हिडीओ पाहून नेटकरी कमेंट करत आहेत. ‘ही खूपच गोंडस आहे,’ ‘एक ही आजी बघा आणि दुसऱ्या आहेत जया बच्चन,’ ‘राहा बाहुली आहे,’ ‘काही वर्षांनी दीपिका पादुकोणदेखील तिच्या लेकीबरोबर अशीच फिरायला जाताना दिसेल,’ ‘पहिल्यांदाच राहाचा आवाज ऐकला, किती गोड,’ सेलिब्रिटींची मुलं इतक्या लवकर मोठी का होतात,’ ‘आजीला बघून राहा किती आनंदी झाली,’ अशा कमेंट्स या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

“मंत्र्याची मुलगी मोलकरीण म्हणून आमच्या घरात…”, बॉलीवूड अभिनेत्याच्या पत्नीचा खुलासा; म्हणाली, “तिचे वडील…”

राहाच्या व्हिडीओवरील नेटकऱ्यांच्या कमेंट्स (फोटो – इन्स्टाग्राम)

राहाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी ती आजी सोनी राजदान यांच्याबरोबर दिसते. तर कधी आलिया व रणबीरचा जवळचा मित्र अयान मुखर्जीबरोबर दिसते. कधी राहा आई-बाबांबरोबर त्यांचं नवीन घर बघायला जाते.

बॉलीवूड अभिनेता पत्नीला म्हणतो, “…तर मी माधुरी दीक्षितशी लग्न केलं असतं”; धक धक गर्लच्या स्वभावाचं केलं कौतुक

आलिया व रणबीर यांनी एप्रिल २०२२ मध्ये लग्न केलं. त्यानंतर ६ नोव्हेंबर २०२२ रोजी त्यांची लाडकी लेक राहा कपूरचं त्यांनी स्वागत केलं. राहा लवकरच दोन वर्षांची होईल.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Did you hear raha kapoor cute conversation with grandma neetu kapoor watch video alia bhatt ranbir kapoor hrc