बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्रींचं नाव जेव्हा घेतलं जातं तेव्हा माधुरी दीक्षितचं नाव अव्वल स्थानावर येते. आपल्या सौंदर्याने आणि नृत्याने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य करणारी ‘धक धक गर्ल’ म्हणून तिला कायमच ओळखले जाते. माधुरीने आतापर्यंत अनेक हिट चित्रपटात काम केले आहे. तिचे अनेक चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात आहेत. माधुरी दीक्षितच्या सिनेसृष्टीच्या करिअरमधील कायम लक्षात राहणारा एक चित्रपट म्हणजे दिल तो पागल है…. या चित्रपटाला नुकतीच २५ वर्षं पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने माधुरीने एक खास पोस्ट केली आहे.
शाहरुख खान, करिश्मा कपूर आणि माधुरी दीक्षित यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘दिल तो पागल है’ हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या चित्रपटाला नुकतीच २५ वर्षं पूर्ण झाली. या चित्रपटातील कलाकारांच्या भूमिकांचे प्रचंड कौतुक करण्यात आले. बॉक्स ऑफिसवरही हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटातील गाणीही प्रचंड गाजली. आजही अनेक प्रेक्षक या गाण्यावर थिरकताना दिसतात.
आणखी वाचा : अनिल कपूरसोबत लग्न करण्याच्या प्रश्नावर माधुरीचे थेट उत्तर, म्हणाली “त्याच्याशी लग्न करायला…”
माधुरी दीक्षित ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ‘दिल तो पागल है’ या चित्रपटाला पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिने तिच्या इन्स्टाग्रामवर एक रिल व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती या चित्रपटातील ‘अरे रे ए क्या हुआ’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे.
आणखी वाचा : “माझ्याशिवाय हा चित्रपट…” ‘दिल तो पागल है’ चित्रपटाच्या कोरिओग्राफरचे वक्तव्य चर्चेत
“दिल तो पागल है चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने या चित्रपटातील आवडत्या गाण्यावर थिरकली. या चित्रपटातील तुमचे आवडते गाणे कोणतं? कमेंट करुन कळवा.” असे कॅप्शन माधुरी दीक्षितने दिले आहे.
माधुरी दीक्षितच्या या व्हिडीओला अनेकजण पसंती देताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. यावर अनेकजण कमेंट करताना दिसत आहे. तिचे अनेक चाहते या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे कौतुक करतानाही पाहायला मिळत आहे.