सलमान खान आणि माधुरी दीक्षित यांची प्रमुख भूमिका असलेला ‘हम आपके है कौन’ हा चित्रपट सुपरहिट झाला. या चित्रपटाचं दिग्दर्शन सूरज बडजात्या यांनी केलं होतं. या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर २५० कोटी इतकी कमाई केली होती. हा त्या वेळचा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट होता. आजही हा चित्रपट प्रेक्षक तितक्याच आवडीने बघतात. आता या चित्रपटाची एक खास आठवण अभिनेते दिलीप जोशी यांनी शेअर केली आहे.

‘हम आपके है कौन’ या चित्रपटातील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. यापैकीच एक म्हणजे अभिनेते दिलीप जोशी यांनी या चित्रपटांमध्ये साकारलेली भूमिका. या चित्रपटामध्ये त्यांनी सलमान खान बरोबर स्क्रीन शेअर केला होता. पण या दोघांची मैत्री ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटाच्या निमित्ताने झाली होती. ‘मैंने प्यार किया’ हा सलमान खानची प्रमुख भूमिका असलेला पहिला बॉलीवूड चित्रपट, तर अभिनेते दिलीप जोशी यांचा पहिला हिंदी चित्रपट होता. त्यानंतर ते दोघं ‘हम आपके है कोन’ या चित्रपटामध्ये एकत्र झळकले.

Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
akshay kelkar girlfriend sadhana kakatkar
१० वर्षे नातं ठेवलं गुपित; अखेर दिली प्रेमाची कबुली! अक्षय केळकरची ‘रमा’ आहे तरी कोण? पोस्ट शेअर करत म्हणाली, “त्याने वचन…”
mudassar khan riya kishanchandani welcome baby girl
Video: वर्षभरापूर्वी केलं आंतरधर्मीय लग्न, सलमान खानचा जवळचा मित्र झाला बाबा; पत्नीने मुलीला दिला जन्म
zakir hussain account first post after demise
झाकीर हुसैन यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर कुटुंबियांकडून पोस्ट; ‘तो’ खास फोटो शेअर करत लिहिलं…
vivek oberoi rani mukerji sathiya
पोलीस आले अन्…; जेव्हा राणी मुखर्जीच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये लपलेला विवेक ऑबेरॉय, नेमकं काय घडलेलं?
Bollywood Actress Marathi Film Debut
सलमान खानच्या शोमुळे लोकप्रिय झाली; ‘ही’ बॉलीवूड अभिनेत्री आता मराठीत पदार्पण करणार! पहिली झलक आली समोर

आणखी वाचा : जीवाला धोका असण्याच्या चर्चांवर संतापला जेठालाल, म्हणाला, “ज्याने ही बातमी पसरवली…”

‘राजश्री प्रोडक्शन’ला दिलेल्या मुलाखतीत ‘हम आपके है कौन’ चित्रपटादरम्यानची सलमान खानबरोबरची आठवण शेअर करताना दिलीप जोशी म्हणाले, “सूरज बडजात्या सर्व कलाकारांना समान वागणूक द्यायचे. चित्रपटातील नायक असो नाही तर इतर पात्र साकारणारे कलाकार; ते सर्वांना समान वागवायचे. ‘हम आपके है कौन’ चित्रपटाचं शूटिंग फिल्मिस्तानमध्ये होतं तेव्हा मी सलमानबरोबर रूम शेअर केली होती. यावर सलमानने कधीच तक्रार केली नाही किंवा मला त्याने माज दाखवला नाही. त्याने मला खूप मदत केली.”

हेही वाचा : “पैसा यांना काय काय करायला लावतो…” ‘त्या’ व्हायरल व्हिडीओमुळे सलमान खान व अक्षय कुमार ट्रोल

या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांना सूरज बडजात्या यांनीदेखील खूप मदत केली, असं दिलीप जोशी म्हणाले. त्यांनी सांगितलं, “मी सहारा स्टुडिओमध्ये एका टीव्ही शोसाठी शूटिंग करायचो. मी निर्मात्यांना सांगितलं की त्या शोसाठी माझ्या चार तारखा बुक झाल्या आहेत. त्यामुळे त्यांनी त्यानुसार ‘हम आपके है कौन’चे शूट अ‍ॅडजस्ट केलं. मी त्यांच्याकडे जेव्हा गेलो तेव्हा त्यांना माझ्या सर्व समस्या सांगितल्या. लगेच त्यांनी त्यांच्या साहाय्यकाला स्क्रिप्ट आणि वेळापत्रक घेऊन बोलावलं. त्यांनी ते वेळापत्रक पाहिलं आणि मला विचारलं, तू मला तुझा संपूर्ण एक दिवस आणि दुसऱ्या दिवशीचा सकाळपर्यंतचा वेळ देऊ शकतोस का? जेणेकरून ते माझे काही क्लोज-अप शॉट घेऊ शकतील. त्यांनी सर्व काही जुळवून घेतलं.

Story img Loader