सुप्रसिद्ध गायक आणि अभिनेता दिसजीत दोसांझ वयाच्या ८व्या वर्षी घरातून पळून गेला होता. अभिनेत्याने सांगितलं की हे त्याने शाळेतल्या एका मुलीसाठी केलं होतं आणि शाळा बु़डवण्यासाठी तो पालकांशीही खोटं बोलला होता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याबद्दलचा किस्सा दिलजीतने सांगितला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज शामानीला दिलेल्या मुलाखतीत दिलजीत म्हणाला, “वयाच्या आठव्या वर्षी मी घरातून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. माझ्या शाळेतल्या एका मुलीमुळे मी घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला होता. जेव्हा मी शाळेत होतो तेव्हा माझे सिनिअर्स मला विचारायचे की तुला कोणती मुलगी आवडते. तेव्हा मी त्या एका मुलीकडे बोट दाखवलं आणि म्हणालो, “मला ती आवडते.” मग माझे सिनिअर्स मला बोलायचे की जा जाऊन तिला सांग म्हणजे ती फक्त तुझ्याशीच लग्न करेल आणि मी त्यावर ओके म्हणालो.”

हेही वाचा… ‘सैराट’ फेम रिंकू राजगुरूच्या वडिलांना हवा आहे ‘असा’ जावई; अभिनेत्री म्हणाली, “हा मुलगा तर…”

दिलजीत पुढे म्हणाला, ” मी त्या मुलीकडे गेलो आणि तिला म्हणालो की आपण दोघं लग्न करू. हे ऐकताच तिने आमच्या शिक्षकांकडे माझी तक्रार केली आणि शिक्षक मला म्हणाले की उद्या तुझ्या पालकांना घेऊन ये आणि तेव्हा तो माझ्यासाठी जगाचा अंत होता.”

“त्यानंतर मी माझ्या घरी गेलो, फ्रिज उघडला आणि दोन केळी आणि काही फळ घेतली आणि ती माझ्या सायकलमध्ये ठेवली. सायकल घेऊन मी घरातून बाहेर पडलो. मी फक्त पाच मिनिटांच्या अंतरांवर गेलो असेन तेवढ्यात एका गावकऱ्याने मला पाहिलं आणि तो माझ्यावर ओरडला आणि मला म्हणाला, कुठे जातोयस तू? तुझ्या घरी परत जा. तेव्हा गावाकडे असं काही नव्हत की फक्त तुमचे पालकच तुम्हाला ओरडतात वगैरे, तेव्हा गावातली सगळी लोकं एका कुटुंबासारखीच राहायची आणि ती लोकं मुलांवर ओरडायची आणि कधीकधी त्यांना मारायचीसुद्धा. तेव्हा त्या माणसाने मला घरी परत जायला सांगितलं जेव्हा मी घर सोडून जायच्या विचारात होतो. मग दुसऱ्या दिवशी मी घरी पोटात दुखतंय असं खोटं सांगून शाळेला दोन दिवस दांडी मारली. मग माझ्या शिक्षकांनीही तो विषय सोडून दिला.”

हेही वाचा… “त्याने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला अन्…, ‘बालिका वधू’ फेम आनंदीने सांगितला ‘तो’ धक्कादायक प्रसंग, म्हणाली…

दरम्यान, दिलजीत दोसांझ नुकताच ‘अमर सिंग चमकिला’ या चित्रपटात अभिनेत्री परिणीत चोप्रासह झळकला होता. तर अभिनेत्याचा ‘जट्ट अँड ज्युलिएट-३’ हा पंजाबी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diljit dosanjh a singer and actor at the age of 8 ran away from home for a school girl he used to like dvr