दिलजीत दोसांझ हा लोकप्रिय बॉलीवूड व पंजाबी अभिनेता आहे. दिलजीत उत्तम अभिनेता असण्याबरोबरच गायकही आहे. तो सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. दिलजीत विविध प्रकारचे फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असतो. त्याने नुकताच शेअर केलेला एक व्हिडीओ चर्चेत आहे.
दिलजीत दोसांझने मुंबईच्या दादर फूल मार्केटमधील एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओत तो फुलांची खरेदी करताना दिसतोय. अगदी सामान्यांच्या गर्दीत शिरत दिलजीतने फुलांची खरेदी केली. त्याच्याजवळ एक पिशवी दिसतेय, ज्यामध्ये त्याने काही फुलं ठेवली आहेत. व्हिडीओत चाहते त्याच्याबरोबर सेल्फी घेतानाही दिसत आहेत. ‘दादर, मुंबई 24’ असं कॅप्शन देत त्याने हा सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे.
रिहाना एका कार्यक्रमासाठी किती मानधन घेते? अनंत अंबानी-राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंगमध्ये…
फूल मार्केटमधून दिलजीत विविध प्रकारच्या फुलांचा वास घेताना आणि त्याची खरेदी करताना दिसतोय. दिलजीतने शेअर केलेल्या या व्हिडीओवर सेलिब्रिटी व चाहते लाइक्स अन् कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. व्हिडीओ खूप सुंदर आहे, असं आयुष्मान खुरानाने कमेंट करत म्हटलंय.
दरम्यान, दिलजीत दोसांझ सध्या जामनगरमध्ये आहे. राधिका मर्चेंट व अनंत अंबानी यांच्या प्री-वेडिंग सोहळ्यात तो परफॉर्म करणार आहे, त्यासाठी तो शनिवारी सकाळी जामनगरला पोहोचला.