दिलजीत दोसांझच्या जयपूर कॉन्सर्टदरम्यान, एक मुलगी गाणे ऐकताना भावूक होऊन रडली. त्यामुळे तिला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आले होते. त्यावर दिलजीतने त्याच्या या चाहतीची बाजू घेत, प्रत्येकाला भावना व्यक्त करण्याचा अधिकार असल्याचे ठामपणे सांगितले. एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये दिलजीत म्हणाला, “फक्त ज्यांच्याकडे भावना आहेत, तेच रडू शकतात.”
जयपूर कॉन्सर्टमधील घटना
दिलजीत दोसांझने (Diljit Dosanjh) २६ ऑक्टोबरला दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममधील कॉन्सर्टद्वारे आपल्या ‘दिल-लुमिनाटी इंडिया टूर’ला सुरुवात केली. त्यानंतर जयपूरमध्ये त्याची कॉन्सर्ट झाली. जयपूरच्या परफॉर्मन्सनंतर दिलजीतने एक व्हिडीओ शेअर केला, ज्यात तो ‘दिल तेनू दे दिता मै ता सोनेया’ हे गाणं गात असताना एक मुलगी रडताना दिसते आहे. या व्हिडीओवरून सोशल मीडियावर त्या मुलीची खिल्ली उडवण्यात आली. त्याशिवाय कॉन्सर्टदरम्यान दिलजीतने एका पुरुषाच्या प्रेयसीला आपले जॅकेट भेट दिल्याने तो भावूक झाला आणि त्यालाही ट्रोल करण्यात आले.
हेही वाचा…“परवीन बाबीने मला सोडलं, कारण मी तिला…”, कबीर बेदी यांचा मोठा दावा; म्हणाले…
h
हैदराबाद कॉन्सर्टमध्ये उत्तर
हैदराबादच्या कॉन्सर्टमध्ये दिलजीतने या ट्रोलिंगचा समाचार घेतला. ट्रोलिंगला उत्तर देताना त्याने एक व्हिडीओ पोस्ट करीत त्याला, “स्वतःचा आत्मसन्मान ओळखणाऱ्या स्त्रियांना कोणत्याही मान्यतेची गरज नाही. त्यांच्यातील तेजच त्यांचा मार्ग उजळवते,” अशी कॅप्शन दिली.
व्हिडीओमध्ये दिलजीतने पंजाबी भाषेत सांगितले, “संगीत एक भावना आहे. ते लोकांना हसवते, नाचायला लावते, संघर्ष करायला लावते, प्रेमात पाडते आणि कधी कधी रडायलाही भाग पाडते. मीही अनेक वेळा संगीत ऐकून रडलेलो आहे. फक्त ज्यांच्याकडे भावना आहेत, तेच रडतात. मी तुमच्याबरोबर आहे; काळजी करू नका.”
पाहा व्हिडीओ –
महिला स्वातंत्र्यावर वक्तव्य
दिलजीत पुढे म्हणाला, “या मुली— त्यांना कोणीही थांबवू शकत नाही. त्या स्वतंत्र आहेत; फक्त पुरुषच नाही, तर महिलादेखील कमावतात आणि मजाही करतात. तुम्ही त्यांना असे ट्रोल करून, त्यांचा अपमान करीत आहात म्हणजेच तुम्ही देशातील मुलींचा अपमान करीत आहात.”
हेही वाचा…सुशांत सिंह राजपूतने प्रतीक बब्बरला सांगितलेली ‘ही’ इच्छा राहिली अपूर्ण, खुलासा करत म्हणाला…
व्हिडीओमध्ये दिलजीतच्या शोमध्ये अनेक महिला भावूक झाल्याचे दृश्य दाखविण्यात आले. शेवटी एका महिलेने सांगितले, “मी रडले. मला माझ्या भावना व्यक्त करताना कोणतीही लाज वाटली नाही. मी एक मुलगी ट्रोल होत असल्याचं पाहिलं; पण मी ते नैसर्गिकरीत्या अनुभवलं. रडणं हे पूर्णपणे नैसर्गिक आहे.”
दिलजीत दोसांझच्या व्हिडीओवर चाहते कमेंट करीत त्याचे समर्थन करीत आहेत. दिलजीतची ‘दिल-लुमिनाटी इंडिया टूर’ डिसेंबरमध्ये पूर्ण होणार आहे.