गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ आपल्या गाण्यांमुळे तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे. भारतात कोल्डप्लेच्या कॉन्सर्टची तिकिटे काही क्षणांत विकली गेली होती, त्यानंतर सोशल मीडियावर ‘कोल्डप्ले विरुद्ध दिलजीत दोसांझ’ असे मीम्स शेअर झाले होते. यावरून लक्षात येते की दिलजीतचे कॉन्सर्टही प्रचंड लोकप्रिय आहेत. सध्या दिलजीत इंग्लंडमध्ये आपली ‘दिल लुमिनाटी टूर’ करत आहे. याच कॉन्सर्टमध्ये दिलजीतने एका पाकिस्तानी चाहतीला बूट भेट म्हणून दिले. या चाहतीशी दिलजीतने केलेल्या संवादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

दिलजीत सध्या इंग्लंडमध्ये ‘दिल लुमिनाटी टूर’ अंतर्गत कॉन्सर्ट करत आहे. याच टूरमध्ये तो मँचेस्टर येथे एक लाईव्ह कॉन्सर्ट करत होता. याच लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान दिलजीतने पाकिस्तानी चाहतीशी संवाद साधला.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
punha kartvya aahe
Video : “आपलं लग्न मोडलेलं…”, आकाशने उचलले मोठे पाऊल; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत ट्विस्ट; नेटकरी म्हणाले, “आकाश भाऊ संपला विषय”
Diljit Dosanjh invokes Rahat Indori poetry amid calls to cancel Indore concert
कॉन्सर्ट रद्द करण्यासाठी बजरंग दलाचे आंदोलन, दिलजीत दोसांझ म्हणाला, “किसी के बाप का हिंदुस्तान थोडी है”
Shashank Ketkar
‘मुरांबा’ मालिकेचे ९०० भाग पूर्ण; व्हिडीओ शेअर करत शशांक केतकर म्हणाला, “खूप भावुक…”

हेही वाचा……अन् मद्य घेण्याआधी गोविंदाने घेतलेली आईची परवानगी; सुनीता आहुजा किस्सा सांगत म्हणाली, “त्याने आईला फोन केला आणि….”

काय म्हणाला दिलजीत?

पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझने नुकत्याच झालेल्या त्याच्या शोमध्ये पाकिस्तानी चाहतीशी संवाद साधताना म्हटले, “हिंदुस्तान असो किंवा पाकिस्तान, माझ्यासाठी दोन्ही देश सारखेच आहेत. पंजाबी लोकांच्या हृदयात प्रत्येकासाठी प्रेम आहे. या सीमारेषा (बॉर्डर) राजकारण्यांनी तयार केल्या आहेत, पण जे लोक पंजाबी भाषा बोलतात, ते कुठेही राहणारे असोत, ते सगळे एकच आहेत; त्यामुळे भारतातून आलेल्या लोकांचं स्वागत आहे आणि पाकिस्तानातून आलेल्यांचंही स्वागत आहे, धन्यवाद मॅडम.”

आणि दिलजीतने आईला मिठी मारली

दिलजीतने त्याच्या कॉन्सर्टमध्ये पहिल्यांदाच आपल्या कुटुंबातील सदस्यांची ओळख चाहत्यांशी करून दिली. शोदरम्यान त्याने एका महिलेसमोर नतमस्तक होऊन तिला मिठी मारली. त्यानंतर तिचा हात पकडून प्रेक्षकांना सांगितलं, “ही माझी आई आहे.” दिलजीतने आईची ओळख करून दिली तेव्हा त्याच्या आईच्या डोळ्यांत अश्रू होते. दिलजीतने आईला पुन्हा मिठी मारली. त्यानंतर दिलजीत दुसऱ्या एका महिलेच्या समोर झुकला आणि तिच्याशी हस्तांदोलन केलं. तो म्हणाला, “ही माझी बहीण आहे, आज माझं कुटुंब इथे आलं आहे.”

हेही वाचा…जिच्यासाठी मुलगा पाहायले गेला, तिच्याशीच नंतर केलं लग्न; बॉलीवूड अभिनेत्याची फिल्मी लव्ह स्टोरी, पत्नीला ठेवलेलं मुलांच्या वसतिगृहात

दिलजीतच्या या कृतीमुळे त्याच्या चाहत्यांच्या हृदयात त्याच्याविषयी अधिक प्रेम आणि आदर निर्माण झाला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर करत चाहते दिलजीतचं कौतुक करत आहेत. दिलजीत ऑक्टोबर महिन्यात भारतातही त्याचं कॉन्सर्ट करणार आहे.

Story img Loader