Diljit Dosanjh : अभिनेता-गायक दिलजीत दोसांझच्या ‘दिल-ल्यूमिनाटी टूर २०२४’ चे कॉन्सर्ट भारतासह जगभर गाजत आहेत. सध्या भारताच्या विविध शहरांत हे कॉन्सर्ट होत असून प्रत्येक शहरात दिलजीतने गायनाचं सादरीकरण केल्यावर तिथे त्या कॉन्सर्टची चर्चा होते. दिलजीत दोसांझचे कोलकात्यातील कॉन्सर्ट प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय ठरले. हे कॉन्सर्ट दिलजीतच्या चाहत्यांबरोबरच बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान आणि त्याचा आयपीएल संघ कोलकाता नाईट रायडर्स (KKR)च्या चाहत्यांसाठीही संस्मरणीय ठरले.

‘दिल-ल्यूमिनाटी टूर २०२४’ चा भाग असलेल्या या कार्यक्रमात दिलजीतने KKR च्या ‘कोरबो लोरबो जीतबो रे’ (आपण करू, लढू, जिंकू) या टॅगलाईनवर आधारित एक प्रेरणादायक संदेश दिला.

हेही वाचा…Pushpa 2 : हिंदी डबसाठी पुन्हा एकदा मराठमोळ्या श्रेयस तळपदेचा आवाज! अल्लू अर्जुनबद्दल म्हणाला, “आत्मविश्वास, स्वॅग अन्…”

दिलजीतने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत या टॅगलाईनचे कौतुक केले आणि त्याचा अर्थ समजावून सांगत एक संदेश दिला. तसेच शाहरुख खानबद्दल त्याने आपले प्रेम व्यक्त केले. तो म्हणाला, ” केकेआरची ‘कोरबो लोरबो जीतबो रे’ ही खूप सुंदर टॅगलाईन आहे. ही लाईन ऐकून मला खूपच छान वाटली, ही लाईन ऐकून आवडणारच होती, कारण ही ज्या टीमची टॅगलाईन आहे ती शाहरुख खान सरांची टीम आहे, आम्ही सरांचे चाहते आहोत, त्यामुळे हा खूप चांगला मंत्र आहे. याचा अर्थ मेहनत करा, तुमच्या संघाबरोबर लढा आणि जिंका असा आहे. तुम्ही १०० टक्के मेहनत केली, तर विजयाशिवाय दुसरा पर्यायच राहत नाही.”

दिलजीतने कोलकात्याबद्दलही आपुलकी व्यक्त करत शहराला ‘सिटी ऑफ जॉय’ असे संबोधले. तो म्हणाला, “कोलकात्याला सिटी ऑफ जॉय म्हणतात, नाही का? तुम्हाला अभिमान वाटेल असे अनेक महान व्यक्तिमत्त्व तुम्हा लोकांजवळ आहेत, मग ते आध्यात्मिक नेते असोत किंवा रवींद्रनाथ टागोर. मी त्यांच्याबद्दल वाचत होतो. मला त्यांचे एक विधान खूप आवडले. कोणीतरी त्यांना विचारले की, तुम्ही राष्ट्रगीत लिहिले आहे, तर जागतिक गीतही लिहा. त्यांनी खूप सुंदर उत्तर दिले. ते म्हणाले, ‘गुरु नानक देवजींनी ते १५ व्या शतकातच लिहिले आहे.”

हेही वाचा…कोल्हापूरच्या मराठमोळ्या सरिताच्या प्रेमात पडलेला आर माधवन! सांगितलं २५ वर्षांच्या वैवाहिक आयुष्याचं गुपित, म्हणाला…

दिलजीतचा हा व्हिडीओ पाहून शाहरुख खानने स्वतः प्रतिक्रिया दिली. त्याने दिलजीतचे आभार मानले आणि ‘कोरबो लोरबो जीतबो रे’ चा संदर्भ दिल्याबद्दल प्रशंसा केली. शाहरुखने लिहिले, “सिटी ऑफ जॉयला आनंदाने भरून टाकल्याबद्दल धन्यवाद, दिलजीत पाजी. मला खात्री आहे की केकेआरच्या सर्व सदस्यांना आणि त्यांच्या चाहत्यांना ‘कोरबो लोरबो जीतबो’चा संदर्भ आवडला असेल. तुझ्या दौऱ्याला शुभेच्छा, खूप प्रेम.”

दिलजीत दोसांझचा कोलकात्यातील हा कार्यक्रम ‘दिल-ल्यूमिनाटी टूर २०२४’ चा एक भाग होता. या टूरचा भारतातील पहिला टप्पा ऑक्टोबरमध्ये नवी दिल्ली येथे झाला होता. या टूरदरम्यान दिलजीत बेंगळुरू (६ डिसेंबर), इंदूर (८ डिसेंबर), चंदीगड (१४ डिसेंबर) आणि गुवाहाटी (२९ डिसेंबर) यांसारख्या शहरांनाही भेट देणार आहे.

हेही वाचा…Pushpa 2 : चित्रपटातील धमाकेदार गाणं प्रदर्शित, अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाचा Peelings वर एनर्जेटीक डान्स

शाहरुख खान सध्या ‘डंकी’ (२०२३) नंतर सुजॉय घोष यांच्या ‘किंग’ सिनेमावर काम करत आहे. या सिनेमात तो त्याची मुलगी सुहाना खानबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे, तर २०२४ हे वर्ष दिलजीतसाठी सिनेमांच्या बाबतीत अत्यंत यशस्वी ठरले आहे. त्याचे तीनही चित्रपट — पंजाबी रोमँटिक कॉमेडी ‘जट्ट अँड ज्युलिएट ३’, हिंदी कॉमेडी ‘क्रू’ आणि नेटफ्लिक्स बायोग्राफिकल ड्रामा ‘अमर सिंग चमकीला’ प्रेक्षकांसह समीक्षकांनाही आवडले आहेत.