Ratan Tata Passed Away: उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनाने देशभरात शोककळा पसरली आहे. फक्त भारतातूनच नाही तर जगभरातून लोक त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. पंजाबी सुपरस्टार दिलजीत दोसांझ सध्या परदेशात आहे. तिथेच लाइव्ह कॉन्सर्ट करताना त्याला रतन टाटा यांच्या निधनाची बातमी समजली, त्यानंतर त्याने केलेल्या कृतीचं नेटकरी कौतुक करत आहे.

दिलजीत दोसांझने उद्योगपती रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली. दिलजीत जर्मनीत कॉन्सर्ट करत होता, तेव्हा त्याला रतन टाटा यांच्या निधनाची बातमी समजली. त्यानंतर त्याने केलेल्या कृतीचं लोक कौतुक करत आहेत. दिलजीने रतन टाटांच्या निधनाबद्दल कळाल्यावर कॉन्सर्ट थांबवला. त्याने उपस्थितांना रतन टाटांच्या निधनाची माहिती दिली आणि त्यांच्याकडून आयुष्यात शिकण्यासारख्या कोणत्या गोष्टी आहेत, त्याबद्दल सर्वांना सांगितलं.

Navari Mile Hitlarla
Video: सत्य की स्वप्न? लीला व एजेमधील जवळीकता वाढणार; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट; म्हणाले, “आमच्या अपेक्षा…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Kurla Bus Accident: Amid Probe, Viral Video Shows Another BEST Driver Buying Liquor From Wine Shop In Mumbai's Andheri shocking video viral
मुंबईत हे काय चाललंय? बेस्ट चालकाने बस थांबवली, वाईन शॉपवरुन दारु घेतली; कुर्ला अपघातानंतर दुसरा धक्कादायक VIDEO व्हायरल
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
Zeenat Aman
‘डॉन’ नाही, तर ‘या’ चित्रपटात दिसणार होतं ‘खइके पान बनारस वाला’ गाणं पण…, झीनत अमान यांनी सांगितलेला किस्सा चर्चेत
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
Navri Mile Hitlerla actress dance on Kishore kumar Eena Meena Deeka song watch video
Video: ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील कलाकारांचा किशोर कुमार यांच्या ‘या’ गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ
Diljit Dosanjh invokes Rahat Indori poetry amid calls to cancel Indore concert
कॉन्सर्ट रद्द करण्यासाठी बजरंग दलाचे आंदोलन, दिलजीत दोसांझ म्हणाला, “किसी के बाप का हिंदुस्तान थोडी है”

हेही वाचा – रतन टाटा यांच्या निधनानंतर सिमी गरेवाल यांची भावनिक पोस्ट; म्हणाल्या, “तुमचं जाणं सहन करणं…”

दिलजीत दोसांझने व्यक्त केल्या भावना

रतन टाटा यांना कधीच भेटता आलं नाही, मात्र त्यांचा आयुष्यावर मोठा प्रभाव आहे, असं दिलजीतने मंचावर सांगितलं. “तुम्हा सर्वांना रतन टाटा यांच्याबद्दल माहिती आहे. त्यांचे निधन झाले आहे. त्यांना माझी ही छोटीशी श्रद्धांजली. आज मला त्यांचं नाव घेणं फार महत्त्वाचं वाटतं, कारण त्यांनी आयुष्यभर खूप मेहनत केली. मी त्याच्याबद्दल जे ऐकलंय आणि जे वाचलंय, त्यानुसार मी त्यांना कधीच कोणाबद्दल चुकीचं बोलताना पाहिलं नाही,” असं दिलजीत पंजाबीत म्हणाला.

हेही वाचा – एकेकाळी रतन टाटा होते ‘या’ बॉलीवूड अभिनेत्रीच्या प्रेमात, पण होऊ शकलं नाही लग्न

“त्यांनी आयुष्यात खूप कष्ट केले, चांगली कामं केली, इतरांची नेहमीच मदत केली. हेच जीवन आहे आणि ते असेच असायला हवे. त्यांच्याकडून आपण एक गोष्ट शिकू शकतो, ती म्हणजे आपण कठोर परिश्रम केले पाहिजे, नेहमी सकारात्मक विचार केले पाहिजे, लोकांची मदत करायला पाहिजे आणि आपलं आयुष्य भरभरून जगायला पाहिजे,” असं दिलजीत दोसांझ म्हणाला.

दिलजीत दोसांझचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याच्या या व्हिडीओवर नेटकरी कमेंट्स करून त्याचं कौतुक करत आहेत. ‘दिलजीत त्याच्या प्रत्येक कॉन्सर्टमधून तो आयुष्याचे धडे देत असतो,’ ‘एका दिग्गजाचे दुसऱ्या दिग्गजाला अभिवादन, दिलजीत तू ग्रेट आहेस,’ ‘यशस्वी लोक यशस्वी लोकांचे नेहमीतच कौतुक करतात,’ ‘रतन टाटांच्या निधनाच्या बातमीवर विश्वास बसत नाहीये,’ अशा कमेंट्स दिलजीतच्या या व्हिडीओवर आहेत.

netizens praised Diljit Dosanjh Ratan Tata death
दिलजीत दोसांझच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स

रतन टाटा यांचे बुधवारी रात्री ९ ऑक्टोबर रोजी निधन झाले. प्रकृती बिघडल्याने त्यांना सोमवारी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते आयसीयूमध्ये होते. बुधवारी रात्री उशिरा त्यांचे निधन झाले.

Story img Loader