९० च्या दशकात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालणारी अभिनेत्री ट्विंकल खन्नाचा आज वाढदिवस आहे. अभिनेता अक्षय कुमारचे लग्न केल्यानंतर तिने मनोरंजन सृष्टीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. आता ती आपल्याला काही जाहिरातींमध्ये झळकताना दिसते. पण गेली अनेक वर्ष ती तिच्या इंटिरियर डिझाईनिंग या क्षेत्राकडे लक्ष देत आहे. पण अक्षयशी लग्न करण्यापूर्वी ट्विंकलची आई अभिनेत्री डिंपल कपाडिया यांनी अक्षयला ट्विंकलबरोबर लिव्ह इनमध्ये राहण्याची अट घातली होती.

अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांची लव्ह स्टोरी अत्यंत फिल्मी आहे. त्यांनी २००१ साली लग्नगाठ बांधली. पण त्यापूर्वी ते दोघं एक वर्ष लिव्ह इनमध्ये राहत होते. त्यांच्या या कृतीमागचं कारण होतं ट्विंकलची आई डिंपल कपाडिया.

The Storyteller Movie Review in marathi
द स्टोरीटेलर : गोष्टीच्या गोष्टीची सुरेख वीण
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Karuna and Dhananjay Munde
Anjali Damania : अंजली दमानियांची पोस्ट चर्चेत, “करुणा या धनंजय मुंडेंच्या पहिल्या पत्नी, मी…”
Sanam Teri Kasam actress Mawra Hocane married to Pakistani actor Ameer Gilani
‘सनम तेरी कसम’च्या सरूने केलं लग्न, पाकिस्तानी अभिनेत्री मावराने निकाहचे फोटो शेअर करून चाहत्यांना दिला सुखद धक्का
Shreya Ghoshal Wedding Anniversary
श्रेया घोषालच्या लग्नातील फोटो पाहिलेत का? गायिकेने लग्नाला १० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने केली खास पोस्ट शेअर, म्हणाली…
Ranbir Kapoor and Alia Bhatt daughter raha clicks Shaheen Bhatt photo
रणबीर कपूर-आलिया भट्टची दोन वर्षांची लेक झाली फोटोग्राफर! राहाने आई-बाबांचा नाही तर ‘या’ खास व्यक्तीचा काढला सुंदर फोटो
Prateik Babbar second marriage date out
स्मिता पाटील यांचा मुलगा करतोय दुसरं लग्न, प्रतीकच्या लग्नाची तारीख आली समोर; होणारी पत्नी कोण? वाचा…
Telangana News
मत्यूनंतर दहा दिवस घरातच ठेवला आईचा मृतदेह, दोन बहि‍णींनी…; दुःखद घटनेने तेलंगणा हादरले

आणखी वाचा : “त्यावेळी माझ्या शरीरावर खूपच कमी कपडे होते आणि…”; भूमी पेडणेकरने सांगितला ‘तो’ सेक्स सीन शूट करतानाचा अनुभव

अक्षय कुमारने काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, “मी ट्विंकल चा हात मागण्यासाठी जेव्हा त्यांच्या घरी गेलो तेव्हा तिची आई डिंपल कपाडिया यांनी मला एक अट घातली. त्या म्हणाल्या होत्या की, एक वर्ष तुला ट्विंकल बरोबर लिव्ह इनमध्ये राहावं लागेल. जर तू यशस्वी झालास तरच ट्विंकलचं लग्न तुझ्याशी लावून देऊ.” डिंपल कपाडिया यांची ही अट ऐकून अक्षय कुमार गोंधळात पडला. पण त्याने ही अट मान्य केली.

हेही वाचा : Video: अक्षय कुमारचा असह्य अवतार…नेटकऱ्यांआधी बायकोकडूनच झाला ट्रोल

तर ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये ट्विंकल खन्ना हिने आईच्या या अटीमागचं कारण सांगितलं होतं. तिने खुलासा केला होता की, “माझ्या आईला तेव्हा अक्षय समलिंगी वाटायचा. तिला तिच्या एका पत्रकार मैत्रिणीने सांगितलं होतं की अक्षय समलिंगी आहे. म्हणून तिने लग्नपूर्वी अक्षयला मध्ये राहण्याची अट घातली होती.” ट्विंकलचं हे बोलणं ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटलं होतं.

Story img Loader