Dimple Kapadia daughter Twinkle Khanna : ज्येष्ठ अभिनेत्री डिंपल कपाडिया यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये त्या त्यांची लेक ट्विंकल खन्नाबरोबर फोटोसाठी देण्यास नकार देतात. यावेळी त्याने ट्विंकलला ज्युनिअर म्हटलं. मुंबईतील एका कार्यक्रमातील हा व्हिडीओ आहे. ट्विंकल व डिंपल यांनी ‘गो नोनी गो’ या चित्रपटाच्या स्क्रीनिंगला हजेरी लावली होती. ट्विंकल इथे पती आणि अभिनेता अक्षय कुमारबरोबर आली होती.

या कार्यक्रमातील एक व्हिडीओ पापाराझींनी शेअर केला आहे. यात पापाराझी डिंपल कपाडिया यांना त्यांची मुलगी ट्विंकलबरोबर पोज देण्याची विनंती करतात. मात्र डिंपल यांनी तिच्याबरोबर फोटो काढण्यास नकार दिला. “मी ज्युनियर्सबरोबर फोटोसाठी पोज देत नाही, फक्त सिनिअर्सबरोबर देते,” असं त्या म्हणाल्या. त्यांचा हा व्हिडीओ इन्स्टंट बॉलीवूड व विरल भयानीने शेअर केला आहे.

हेही वाचा – अखेर ७ वर्षांनी वाद मिटला! जखमी गोविंदाची भाचा कृष्णा अभिषेकने घेतली भेट; म्हणाला, “मामींना भेटण्याची भीती…”

डिंपल कपाडिया यांच्या या व्हिडीओवर नेटकरी विविध प्रकारच्या कमेंट्स करत आहेत. काहीजण डिंपल कपाडिया यांच्या विनोदी उत्तराचं कौतुक करत आहेत. तर, काही जण त्या जया बच्चन यांच्याप्रमाणे चिडत असल्याचं म्हटलं आहे.

हेही वाचा – हृतिक रोशनच्या पहिल्याच चित्रपटाची नोंद ‘गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये का झाली होती? ‘हे’ आहे कारण…

दरम्यान, ‘गो नोनी गो’ हा ट्विंकल खन्ना यांची निर्मिती असलेला चित्रपट आहे. या चित्रपटात डिंपल कपाडिया मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाची कथा खूपच हृदयस्पर्शी आहे. यामध्ये मानव कौल आणि अथिया शेट्टीसह इतरही कलाकार दिसतील.

हेही वाचा Video : जडतो तो जीव…; पुरस्कार सोहळ्यात प्रिया बापटने गायलं २५ वर्षे जुन्या मालिकेचं अजरामर गीत, सर्वत्र होतंय कौतुक

डिंपल कपाडिया यांच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास, त्या शेवटच्या लक्ष्मण उटेकर यांच्या ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’मध्ये दिसल्या होत्या. या चित्रपटात क्रिती सेनॉन आणि शाहिद कपूर यांच्या मुक्य भूमिका होत्या.

Story img Loader