डिंपल कपाडिया यांनी राज कपूर यांच्या ‘बॉबी’ सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. डिंपल कपाडिया यांनी या सिनेमातून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली होती. या सिनेमातील डिंपल कपाडिया यांच्या लूकची त्याकाळी प्रचंड चर्चा झाली होती. त्यांचा या सिनेमातील पोल्का डॉटेड ब्लाऊज आजही हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक आयकॉनिक पोशाखांपैकी एक मानला जातो. नुकतंच एका मुलाखतीत, डिंपल कपाडिया यांनी ‘बॉबी’ सिनेमासाठी राज कपूर यांनी त्यांचे लूक कसे तयार केले याबद्दलच्या किस्से सांगितले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज कपूर यांनी विदेशातून आणले होते कपडे

‘वोग इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत, डिंपल कपाडिया यांनी सांगितले की, ‘बॉबी एक आयकॉनिक चित्रपट होता. राज कपूर खूप खास दिग्दर्शक होते. त्यांनी माझा संपूर्ण लूक तयार केला. माझा कपाळाचा भाग खूप लहान होता, यामुळे राज कपूर यांनी माझी हेअर स्टाईल बदलण्याचा निर्णय घेतला. त्यांनी माझ्या केसांवर विविध लूक ट्राय केले; त्यांनी मला केसांचा भांग पडतो त्याची पद्धत बदलायला लावली, माझी हेअर लाईन बदलली, यामुळे मला प्रचंड त्रास झाला.” त्यांनी पुढे सांगितले, “राज कपूर यांनी माझे सर्व कपडे विदेशातून आणले होते. त्यांना आर्चिज कॉमिक्सची खूप आवड होती. ‘बॉबी’मधील आयकॉनिक लुक्स आर्चिज कॉमिक्समधील पात्रांवर आधारित होते.

हेही वाचा…‘या’ देशाने ‘सिंघम अगेन’ आणि ‘भूल भुलैया ३’च्या प्रदर्शनावर घातली बंदी, कारणं नेमकी काय? वाचा

h

१२ व्या वर्षी झाला होता कुष्ठरोग, नंतर मिळाला ‘बॉबी’ सिनेमा

डिंपल कपाडिया अनेकदा आपल्या पहिल्या चित्रपटाच्या आठवणी शेअर करत असतात. डिंपल (Dimple Kapadia) यांनी FICCI FLO Jaipur Chapter शी बोलताना सांगितलं, “मला १२ व्या वर्षी कुष्ठरोग झाला होता, नंतर तो बराही झाला. मात्र, त्यावेळी मला माझ्या एका मित्राने सांगितलं की तुला आता शाळेतून काढून टाकतील. मी त्यावेळी फक्त १२ वर्षांची होते.” त्या म्हणाल्या, “माझे वडील चुन्नीभाई कपाडिया हे चित्रपट व्यवसायातील अनेक लोकांना ओळखत होते. त्यावेळचा एक प्रसिद्ध दिग्दर्शक हा त्यांच्या त्यांचा मित्र होता. त्याने मला काहीतरी अपशब्द ऐकवले. मला कुष्ठरोग झाला होता आणि त्याची खूण माझ्या कोपरावर होती. तुझ्यावर बहिष्कार घातला जाईल हे मला माहीत आहे असं तो मला म्हणाला. त्यावेळी मी बहिष्कार हा शब्दच पहिल्यांदा ऐकला, बहिष्कार म्हणजे काय? ते पण मला माहीत नव्हतं. तसंच कुष्ठरोग झाला असतानाच राज कपूर आयुष्यात आले. त्यांनी बॉबी सिनेमासाठी विचारलं ही आठवणही डिंपल (Dimple Kapadia) यांनी सांगितली.”

बॉबीची स्क्रीन टेस्ट झाल्यावर सुरुवातीला नाकारली गेली होती भूमिका

डिंपल (Dimple Kapadia) पुढे म्हणाल्या, “मी ‘बॉबी’ सिनेमासाठी स्क्रीन टेस्ट दिली, पण रिजेक्ट झाले. त्यावेळी मी एकदा पेपर वाचत होते, तेव्हा माझ्या काही मित्रांनी सांगितले की, बॉबीसाठी राज कपूर नव्या मुलीच्या शोधात आहेत. मी त्या ऑडिशनला गेले, पण मला नकार मिळाला. कारण सांगण्यात आलं की, मी चिंटू ऋषी कपूरपेक्षा मोठी दिसते. त्या काळात मी डायरीत राम राम लिहायचे, पुढे काय झालं ते माहीत नाही. पण, राज कपूर यांनी मला परत बोलावलं. पुढे सगळ्या गोष्टी सुरळीत झाल्या”, ही आठवणही डिंपल यांनी सांगितली.

हेही वाचा…सुनील शेट्टीच्या लग्नात बॉलीवूडच्या केवळ एका सेलिब्रिटीने लावली होती हजेरी, किस्सा सांगत अभिनेता म्हणाला…

.१९७३ साली प्रदर्शित झालेला ‘बॉबी’ हा चित्रपट ऋषी कपूर यांच्या कारकिर्दीतील पहिला चित्रपट होता. डिंपल कपाडिया यांचा १९७० च्या दशकातील हा एकमेव चित्रपट होता, कारण त्यांनी राजेश खन्ना यांच्याशी विवाह केल्यानंतर अभिनय सोडला होता. १९८० च्या दशकात तिने रामेश सिप्पी यांच्या ‘सागर’ चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पुनरागमन केलं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dimple kapadia said raj kapoor created her iconic look in bobby also said it was painful process psg