गेल्या काही वर्षात अनेक मराठी कलाकारांनी आपल्या अभिनयाची छाप बॉलिवूडमध्येही निर्माण केली. मराठी बरोबरच हिंदी चित्रपटांमधील त्यांच्या कामाचे नेहमीच खूप कौतुक होत असते. आता मराठी मनोरंजन सृष्टीच्या प्रेक्षकांना आपल्या अभिनयाची भुरळ घालून बॉलिवूडमध्ये एंट्री करणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत आणखी एक नाव सामील झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा :शाहरुखच्या वाढदिवसानिमित्त अयान मुखर्जीची किंग खानच्या चाहत्यांना खास भेट, पोस्ट शेअर करत म्हणाला…

विविध मालिका आणि नाटकांमधून काम करत प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळवलेली अभिनेत्री दीप्ती लेले बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. तिच्या प्रत्येक कामातून तिने प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. आता लवकरच ती बॉलिवूड चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट म्हणजे कतरिना कैफचा ‘फोन भूत.’ विशेष म्हणजे दीप्ती या चित्रपटात कतरिना कैफबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

बॉलिवूड पदार्पणाबाबत दीप्ती खूप आहे आणि उत्सुक आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत या चित्रपटाबद्दल उत्सुक असल्याचं सांगितलं. या संदर्भात एका मुलाखतीमध्ये ती म्हणाली, “बॉलिवूडमध्ये काम करायला मिळणं हे प्रत्येक कलाकाराचं स्वप्न तसंच आणि ते माझंही होतं. ‘फोन भूत’च्या निमित्तानं हे स्वप्न पूर्ण झालं आहे. या चित्रपटातील माझी भूमिका छोटी असली तरी महत्त्वपूर्ण आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शकांना या भूमिकेसाठी मराठी चेहरा हवा होता. त्यासाठी मी रीतसर ऑडिशन दिली आणि या भूमिकेसाठी माझी निवड झाली. कतरिना कैफ, सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. त्यांच्यासोबत काम करायला मिळणं ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे.”

हेही वाचा : काय होतीस तू, काय झालीस तू…!; कतरिना कैफ नव्या लूकवरून ट्रोल

‘फोन भूत’ हा हॉरर चित्रपट ४ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. गुरमीत सिंग दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती फरहान अख्तरच्या एक्सेल एंटरटेनमेंटद्वारे करण्यात आली आहे. ‘कतरिना कैफ, सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर यांच्या बरोबरीने शीबा चढ्ढा, निधी बिश्त, मनु ऋषी चढ्ढा गुरमीत सिंग असे गुणी कलाकार या चित्रपटामध्ये सहाय्यक व्यक्तिरेखा साकारणार आहेत.