चित्रपटसृष्टीमध्ये चालू असलेल्या घडामोडींवर सातत्याने चर्चा होताना दिसते. कधी कलाकारांची, कधी चित्रपटांची तर कधी भूमिकांची चर्चा होत असलेली पाहायला मिळते. अनेकदा दाक्षिणात्य चित्रपट आणि हिंदी चित्रपट यांच्यात तुलनादेखील झालेली पाहायला मिळते. आता यावर दिग्दर्शक आणि अभिनेता अनुराग कश्यप( Anurag Kashyap)ने वक्तव्य केले आहे.

“कथा सांगण्यापेक्षा कलाकाराच्या लोकप्रियतेवर लक्ष”

बॉलीवूडचे अनेक चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चालत नसल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, त्याचवेळी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीची घोडदौड उत्तम सुरू असल्याचे दिसते. आता अभिनेता आणि दिग्दर्शक अनुराग कश्यपने यावर वक्तव्य केले आहे. बॉलीवूडपेक्षा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी का चांगले काम करत आहे, यावर त्याने भाष्य केले आहे.

Rajinikanth, Rajinikanth will star in coolie movie, Nagarjuna Akkineni, nagarjuna, Sathyaraj, Shruti Haasan, Coolie movie,
सुपरस्टार रजनीकांत, नागार्जुन अन् ‘बाहुबली’ फेम सत्यराज; ‘या’ चित्रपटात दाक्षिणात्य दिग्गजांची मांदियाळी, पोस्टर प्रदर्शित
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
amitabh bachchan reacting on re releasing movies
जुन्या चित्रपटांचे पुन:प्रदर्शन! अमिताभ बच्चन एव्हरग्रीन ‘शोले’बद्दल म्हणाले, “मोबाइलवर कधीही चित्रपट पाहिला नाही…”
old movies, mumbai, movies re-released,
जुन्या चित्रपटांचे पुन:प्रदर्शन; नवीन चित्रपट नसल्याने चार जुने चित्रपट पुन्हा प्रदर्शित
actress kangana ranaut praises indira gandhi during promotion of upcoming hindi film emergency
इंदिरा गांधींच्या आयुष्यातून खूप काही शिकण्यासारखं! अभिनेत्री दिग्दर्शक कंगना राणावतचे मत
What does the Hema committee report say about the casting couch in Malayalam cinema
मल्याळी चित्रपटसृष्टीतही ‘कास्टिंग काऊच’? काय सांगतो न्या. हेमा समिती अहवाल?
Aishwarya Rai Salman Khan in josh
सलमान खान ‘या’ चित्रपटात ऐश्वर्या रायच्या भावाची भूमिका साकारणार होता, पण…; अभिनेत्रीनेच सांगितलेला किस्सा
Loksatta lokrang Dipa Deshmukh book Directors published by Manovikas Prakashan
भारतीय दिग्दर्शकांची गौरवशाली परंपरा

अनुराग कश्यपने ‘द हिंदू’ला दिलेल्या मुलाखतीत, फहाद फाजिलची मुख्य भूमिका असलेला ‘आवेशम’ या चित्रपटाचे कौतुक करताना म्हटले आहे की, या सिनेमात तीन एन्फ्लुएन्सरला महत्त्वाच्या भूमिकेत घेताना निर्मात्यांनी संकोच केला नाही.

बॉलीवूडमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत फक्त लोकप्रिय चेहऱ्यांनाच, कलाकारांनाच संधी दिली जाते. कथा सांगण्यापेक्षा कलाकाराच्या लोकप्रियतेवर लक्ष दिले जाते. अनेकदा बॉलीवूड चित्रपट पुनरावृत्तीच्या सापळ्यात अडकलेले दिसतात. पण, जेव्हा चौकटीच्या बाहेर जाऊन एखादा चित्रपट बनवला जातो, तेव्हा खूप सुंदर चित्रपट निर्माण होतात.

हेही वाचा: ‘बिग बॉस’च्या घरात सूरज चव्हाणला मिळणाऱ्या वागणुकीवरून ‘चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेत्याची संतप्त पोस्ट, म्हणाला, “दोन्ही वेळेची भांडी…”

गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला ’12th फेल’ (12th Fail) आणि यावर्षी प्रदर्शित झालेला ‘लापता लेडीज’ या चित्रपटांचे कौतुक करताना त्याने म्हटले आहे की, जेव्हा वास्तविक गोष्टी लोकांसमोर मांडता, त्यावेळी उत्तम चित्रपट बनवले जातात.

याबरोबरच, ‘किल’ (Kill ) या चित्रपटाचे कौतुक करताना म्हटले आहे की, हा एक ॲक्शन चित्रपट आहे, मात्र स्वत:मध्येच एक वेगळा चित्रपट आहे. त्याने काम केलेल्या ‘महाराजा’ चित्रपटाविषयीदेखील सांगितले की, त्याच्या हिंसाचाराबद्दल बरीच टीका झाली; अशीच टीका ‘किल’ चित्रपटावरदेखील झाली होती. ‘ह्युमन्स ऑफ सिनेमा’ला दिलेल्या एका मुलाखतीत अनुराग कश्यपने बॉलीवूडमध्ये चित्रपटांपेक्षा इतर गोष्टींवर ज्या प्रकारे पैसे खर्च केले जातात, त्यावर टीका केली होती.

दरम्यान, करोना महामारीनंतर चित्रपटांचे गणित बदलेले होते. एकीकडे बॉलीवूडचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले, तर दुसरीकडे दाक्षिणात्य चित्रपटांना प्रेक्षकांनी पसंती दिल्याचे पाहायला मिळाले. २०२३ मध्ये शाहरुख खानच्या ‘पठाण’, ‘जवान’ या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली होती. अनुराग कश्यपने नुकतेच विजय सेतुपतीची मुख्य भूमिका असलेला ‘महाराजा’ या चित्रपटात अभिनय केल्याचे पाहायला मिळाले आहे.