अर्जुन कपूर व भूमी पेडणेकरच्या ‘द लेडी किलर’ चित्रपटाचे पोस्टर एक आठवड्याआधीच प्रदर्शित करण्यात आले अन् त्याचवेळी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख ३ नोव्हेंवर ठरवण्यात आली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला असून प्रेक्षकांनी याकडे पाठ फिरवली आहे. हा एक अर्धवट चित्रपट असून तो प्रदर्शित करायची घिसाट घाई केल्याचंही काही लोकांनी सांगितलं आहे.
कोणतंही प्रमोशन न करता दिग्दर्शक अजय बेहल यांनी शुक्रवारी प्रदर्शित केलेल्या ‘द लेडी किलर’चे बॉक्स ऑफिसवर कलेक्शन फारच निराशाजनक आहे. मीडिया रीपोर्टनुसार पहिल्या दिवशी संपूर्ण देशात या चित्रपटाची फक्त २९३ तिकिटेच विकली गेली. ते पाहता या चित्रपटाचं कलेक्शन हे निव्वळ ३८००० रुपये इतकंच आहे. चित्रपटाचं चित्रीकरणही अर्धवट झाले असल्याचे काही मीडिया रीपोर्टमधून स्पष्ट झाले.
आणखी वाचा : ‘सॅम बहादुर’शी टक्कर घेणाऱ्या ‘अॅनिमल’च्या निर्मात्यांनी लढवलेली ‘ही’ शक्कल चित्रपटासाठी फायदेशीर ठरणार का?
आता खुद्द या चित्रपटाचे दिग्दर्शन अजय बेहल यांनीदेखील ही गोष्ट मान्य केली आहे. अजय यांचे भूमी व अर्जुनसह काही खटके उडाले असल्याने हा चित्रपट अर्धवट राहिल्याचीही चर्चा होती, परंतु ही गोष्ट अजय बेहल यांनी खोडून काढली आहे. चित्रपटाचे बजेट हाताबाहेर जात असल्याने हा चित्रपट अर्धवट राहिला असल्याचंही त्यांनी कबूल केलं आहे. ‘ट्राइड अँड रीफ्यूज्ड प्रोडक्शन’ या यूट्यूब चॅनलबरोबरच्या पॉडकास्टमध्ये अजय बेहल यांनी यावर भाष्य केलं आहे.
अजय म्हणाले, “होय हा चित्रपट अर्धवट सादर करण्यात आला आहे. पटकथेच्या ११७ पानांपैकी ३० पानांचं चित्रीकरण झालेलंच नाही. अर्जुन आणि भूमीची रोमॅंटिक केमिस्ट्री, भूमीच्या पात्राला जडलेलं दारूचं व्यसन, या कथेमध्ये गुरफटलेल्या अर्जुन कपूरची मानसिक स्थिती अशा बऱ्याच गोष्टींची यात कमतरता होती. त्यामुळे जर लोकांना हा चित्रपट अर्धवट आणि विस्कळीत वाटला असेल तर त्याचं मला आश्चर्य वाटत नाही.
अर्जुन व भूमीबद्दल बोलताना अजय म्हणाले, “एक दिग्दर्शक म्हणून ‘द लेडी किलर’चं चित्रीकरण करणं फार अवघड होतं. पण यासाठी कलाकार अजिबात कारणीभूत नाहीत. अर्जुन आणि भूमीबरोबर काम करायला खरंच खूप मजा आली. त्यांनी मनापासून या चित्रपटासाठी काम केलं. यामागील समस्या काही वेगळीच होती.” या चित्रपटाचे हक्क नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मने विकत घेतले आहे. त्यामुळे पुढील काहीच दिवसात हा चित्रपट ऑनलाइनसुद्धा पाहायला मिळणार आहे.