अनुराग कश्यप भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शकांपैकी एक आहेत. अनुराग सध्या त्याच्या ‘केनेडी’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. ‘केनेडी’ हा एकमेव भारतीय चित्रपट आहे. जो या वर्षी ‘कान्स’ चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला आहे. ‘गँग्स ऑफ वासेपूर’, ‘नो स्मोकिंग’, ‘ब्लॅक फ्रायडे’ आणि ‘देव डी’पासून ते ‘रमन राघव २.०’, ‘गुलाल’ आणि ‘मनमर्जियां’ यांसारखे अनुराग कश्यपचे चित्रपट चांगलेच गाजले. अनुराग कश्यपचा प्रत्येक चित्रपट मारामारीने भरलेला असतो. मात्र, खऱ्या आयुष्यात हिंसा करण्याबाबत अनुराग कश्यपने एक मोठा खुलासा केला आहे.

हेही वाचा- ‘विजय ६९’च्या सेटवर अनुपम खेर यांना दुखापत, फोटो शेअर करत म्हणाले…

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

अनुराग कश्यप अनेकदा आपल्या चित्रपटांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत अनुरागने खऱ्या आयुष्यात घडणाऱ्या हिंसाचाराबाबत भाष्य केले आहे. आपल्या प्रत्येक चित्रपटात हिंसा दाखवणारा अनुराग कश्यप म्हणतो की, हिंसेचा त्याच्यावर खऱ्या आयुष्यात खूप परिणाम होतो. अनुराग म्हणाला, ‘हिंसेशी माझे नाते खूप गुंतागुंतीचे आहे. खऱ्या आय़ुष्यात मी रक्त किंवा अपघात पाहिल्यावर बेशुद्ध होतो. अंत्यसंस्कारात सहभागी व्हायला मला भीती वाटते. हिंसेशी माझे खूप कठीण नाते आहे. माझ्या चित्रपटात जरी हिंसा दाखवली गेली तरी माझा व्यक्तिशः त्याच्याशी काहीही संबंध नाही. मी नेहमीच हिंसाचाराला माझ्या आयुष्यातून दूर ठेवले आहे.”

हेही वाचा- शाहरुखच्या ‘या’ गोष्टीचा सुहाना खानला होता प्रचंड तिरस्कार; म्हणाली, “माझे वडील…”

अनुराग कश्यप सध्या ‘कान्स’ फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी फ्रान्समध्ये गेला आहे. अनुरागबरोबर विक्रमादित्य मोटवाने यानेही ‘कान्स’मध्ये सहभाग घेतला आहे. रेड कार्पेटवर चालताना, मोटवाने आणि अनुराग यांनी दिग्दर्शक मार्टिन स्कोर्सेसच्या ‘किलर्स ऑफ द फ्लॉवर मून’ या चित्रपटाच्या प्रीमियरला उपस्थिती लावली होती.

Story img Loader