‘पठाण’ला मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर शाहरुख खानचे चाहते त्याच्या आगामी ‘जवान’ आणि ‘डंकी’ चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत. शाहरुखचा बहुचर्चित ‘जवान’ हा चित्रपट यापूर्वी २ जूनला रिलीज होणार होता, परंतु काही कारणास्तव या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. आता ‘जवान’७ सप्टेंबर २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. किंग खानचे लाखो चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असल्याने निर्मात्यांनी लवकरच ‘जवान’चा टीझर रिलीज करण्यात येईल अशी घोषणा केली आहे.

हेही वाचा : ‘कौन बनेगा करोडपती’ होस्ट करण्यासाठी २३ वर्षांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी ठेवली होती ‘ही’ अट; निर्माते खुलासा करत म्हणाले…

Morya Gosavi Sanjeev Samadhi Festival begins in chinchwad Pune news
पिंपरी: मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाला मंगळवारपासून प्रारंभ; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची उपस्थितीती
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Pushpa 2 Movie News
Pushpa 2 : ‘पुष्पा 2’ हजार कोटींच्या क्लबमध्ये, इतकी बक्कळ कमाई करणारे आणखी सहा चित्रपट कुठले?
Shahrukh Khan
“अबराम व आर्यनचा…”, शाहरुख खान दोन्ही मुलांसह एकत्र काम करणार; अनुभव सांगत म्हणाला…
Bhoot Bangla Release Date
भीती आणि हास्याचा दुहेरी डोस घेऊन येतोय अक्षय कुमार; ‘या’ तारखेला ‘भूत बंगला’ चित्रपट होणार प्रदर्शित
upendra limaye first telugu film director praises him
उपेंद्र लिमयेंचा पहिला तेलुगू चित्रपट! थेट दाक्षिणात्य दिग्दर्शकाकडून कौतुक; म्हणाला, “सर कोणतीही भूमिका…”
Lakhat Ek Aamcha Dada
अखेर डॅडींचा प्लॅन यशस्वी होणार; तेजूचा होणारा नवरा लग्नातून गायब होणार, पाहा ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेचा प्रोमो
aamir khan, shah rukh khan, salman khan
सलमान खान आणि शाहरुख खानबरोबर एकत्र काम करण्याच्या चर्चांवर आमिर खानची प्रतिक्रिया; म्हणाला, “आशा आहे लवकरच…”

‘जवान’ चित्रपटाचा टीझर ‘ई-टाइम्स’च्या रिपोर्ट्सनुसार ७ जुलै किंवा १५ जुलैला रिलीज होण्याची शक्यता आहे. चित्रपट ७ सप्टेंबरला रिलीज होणार असल्याने प्रमोशन किमान २ महिने आधीपासून सुरु करण्याचा निर्मात्यांचा प्रयत्न असणार आहे. शाहरुख खान आणि चित्रपटाचा दिग्दर्शक अ‍ॅटली चेन्नईत ‘जवान’चा भव्य टीझर लॉन्च करणार आहेत. यासाठी काही खास पाहुण्यांना आमंत्रित करण्यात येणार असून सर्वांच्या तारखा ठरल्यानंतर ७ किंवा १५ जुलैमधील एक तारीख निश्चित करण्यात येईल असे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा : मालदीवमध्ये सोनाली सेहगलचा बोल्ड अंदाज; पतीबरोबर शेअर केले रोमँटिक फोटो

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील नव्या दमाच्या सर्वात यशस्वी दिग्दर्शकांपैकी एक म्हणून अ‍ॅटलीला ओळखले जाते. दिग्दर्शक अ‍ॅटली ‘जवान’ या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार असून यासाठी त्याने प्रचंड मेहनत घेतली आहे. यामध्ये शाहरुख खान, नयनतारा, सान्या मल्होत्रा, विजय सेतुपती यांसारख्या दिग्गज कलाकारांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

हेही वाचा : नातवाच्या रिसेप्शनमध्ये धर्मेंद यांनी सादर केली भावुक कविता; अनुपम खेर व्हिडीओ शेअर करीत म्हणाले, “धरमजी…”

दरम्यान, शाहरुख खान ‘जवान’ चित्रपटाबरोबर सलमान खानच्या ‘टायगर ३’ मध्येही कॅमिओ करणार आहे. त्यामुळे ‘पठाण’नंतर पुन्हा एकदा करण-अर्जुनची जोडी प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Story img Loader