बॉलिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक डेव्हिड धवन यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावली होती. त्यांना मधुमेह झाल्याचे समोर आले होते. मात्र, अचानक त्रास सुरु झाल्यानंतर काही आठवड्यांपूर्वी डेव्हिड धवन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. शस्त्रक्रियेनंतर डेव्हिड धवन यांची प्रकृती स्थिर असून संपूर्ण कुटुंब त्यांची काळजी घेताना दिसत आहे.

हेही वाचा- प्रियांका चोप्राला एका महिलेने केलं होतं प्रपोज; अभिनेत्रीने खोटं बोलून केला होता स्वत:चा बचाव, वाचा तो किस्सा

newborn babies killed jhansi marathi news
अन्वयार्थ : ‘उत्तम प्रदेशा’तल्या बाळांची होरपळ
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
Malkapur, Chainsukh Sancheti, Rajesh Ekde,
मलकापुरात विकासकामांचा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी, चैनसुख संचेती आणि राजेश एकडेंमध्ये कलगीतुरा
violence erupts in manipur after recovery of bodies
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; तीन मृतदेह सापडल्यानंतर नागरिक संतप्त; राजकीय नेत्यांच्या घरांवर हल्ले
nashik police
नाशिक: सिडकोत पोलीस संचलन
Maharani Laxmi Bai Medical College, in Jhansi district
Jhansi Hospital Fire : नर्सने काडीपेटी पेटवली अन्… १० अर्भकांचा जीव घेणाऱ्या झाशी रुग्णालयात आग कशी लागली?
kama Hospital study shows increased diabetes prevalence in pregnant women due to changing lifestyles
गर्भधारणेच्या वेळी महिलांना मधुमेहाचा धोका

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार डेव्हिड धवन यांची अँजिओप्लास्टी मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात करण्यात आली. त्यांच्या धमनीत स्टेंट लावण्यात आला आहे. शस्त्रक्रियेनंतर डेव्हिड धवन आता पूर्णपणे बरे आहेत. धवन यांचे कुटुंब त्यांच्या तब्येतीची काळजी घेत आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्य त्यांच्या तब्येतीची काळजी घेताना दिसत आहे. त्यांच्या खाण्यापिण्यापासून दैनंदिन कामांची विशेष काळजी घेतली जात आहे.

मधुमेहामुळे ढासळली प्रकृती

गेल्या वर्षी जून महिन्यातही डेव्हिड धवन यांना ७ दिवस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हा वरुण धवन त्याच्या ‘जुग जुग जिओ’ चित्रपटाचे प्रमोशन करत होता. वडिलांच्या रुग्णालयात दाखल झाल्याची बातमी समजताच त्याने मध्येच प्रमोशन सोडून हॉस्पिटल गाठले होते. त्यावेळीही डेव्हिड यांची प्रकृती मधुमेहामुळे ढासळली होती. डेव्हिड धवनच्या दिग्दर्शनाखाली बनलेला शेवटचा चित्रपट ‘कुली नंबर-१’ होता. २०२० मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात वरुण धवन आणि सारा अली खान मुख्य भूमिकेत होते. डेव्हिडच्या १९९५ मध्ये आलेल्या याच नावाच्या सुपरहिट चित्रपटाचा हा रिमेक होता.

हेही वाचा- अमिरच्या ‘लगान’ चित्रपटाला घाबरला होता करण जोहर; भारत सोडून लंडनला गेला होता निघून, काय आहे तो किस्सा

सुश्मिता सेनवरही अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया

काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेनचीही अँजिओप्लास्टी झाली होती. सुश्मिताने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली होती. सुश्मिताच्या मुख्य धमनीमध्ये ९५ टक्के ब्लॉकेज असल्याने हृदयविकाराचा झटका आला होता.