‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट २८ जुलै रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात रणवीर सिंह, आलिया भट्ट, शबाना आझमी, धर्मेंद्र, जया बच्चन यांच्यासह तगडी स्टारकास्ट आहे. यामध्ये मराठमोळी अभिनेत्री क्षिती जोगने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. तिचे कौतुक करण्यासाठी पती हेमंत ढोमेने एक खास पोस्ट शेअर केली आहे.

पत्नीबरोबरचा एक फोटो शेअर करत हेमंत म्हणाला,
“पाटलीणबाई,
आज तुझ्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा दिवस! करण सरांच्या ऑफिसमधून फोन आल्याचं तू मला सांगितलंस आणि घाई घाईत लुक टेस्ट आणि त्यांच्याबरोबरची तुझी मिटींग आणि तारखा आणि बाकी सगळं ठरलं बघता बघता सिनेमाचं शूट झालं… हा सगळा प्रवास मी जवळून पाहिला… प्रिमियर शो ला तुझ्या सोबत आलो… “He is my husband!” अशी तू सगळ्यांना ओळख करून देत होतीस… काय भारी फिलींग होतं ते! त्या शो नंतर कोण कोण येऊन तुझं कौतुक करत होते… काय कमाल वाटत होतं!

Govinda father in law refused to attend his wedding with Sunita Ahuja
“माझे आजोबा श्रीमंत, तर वडील…”, गोविंदाच्या लेकीचं वक्तव्य; म्हणाली, “माझी आई शॉर्ट्स घालायची…”
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
loksatta editorial on rupee getting weaker day by day against the dollar
अग्रलेख : बबड्या रुपया, कारटा डॉलर
prarthana behere shares emotional post as demise of her brother
“तू अचानक निघून गेलास…”, जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर अभिनेत्री प्रार्थना बेहेरेची भावुक पोस्ट
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”

आज आपण आपल्या मित्रांसोबत सिनेमा पाहिला…तुझं काम आज पुन्हा एकदा बारकाईने बघत होतो! तुझी आजवरची मेहनत, स्वतःच्या जिवावर सारंकाही करण्याची जिद्द हळू हळू फळाला येतेय…सिनेमा संपल्यावर गर्दीतून लोक तुला भेटायला आले आणि त्या साऱ्यांनी तुझ्या साठी टाळ्या वाजवल्या…त्या टाळ्या कधी संपुच नयेत असं वाटत राहिलं… तुझं कौतुक कधीच थांबु नये असं वाटत राहिलं… हे सारं मी साठवून ठेवलंय कायमचं आणि आज तुला आवडत नसताना ही पोस्ट लिहीतोय…
इतक्या भव्य दिव्य सिनेमात, एवढ्या मोठ्या नटांमधे, त्या सगळ्या झगमाटात तू लख्खं चमकत होतीस… तुझ्या कामाने! कमाल!

क्षिती मला तू कायमंच आनंद दिलायस पण रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटाबद्दल थँक्यू! आपणंच हे सारं केलंय, हे सग्गळं आपलंच यश आहे असं खुळ्यागत वाटणारा तुझा या जगातला सगळ्यात मोठा चाहता…हेमंत. खूप खूप मोठी हो, love you!”

या चित्रपटात क्षितीने रणवीर सिंहच्या आईची भूमिका साकारली आहे. पूनम रंधावा असं तिच्या पात्राचं नाव आहे. हेमंतच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहे. ज्यांनी चित्रपट पाहिलाय ते क्षितीचं भरभरून कौतुक करत आहेत. तर, अनेकांनी आपण चित्रपट पाहणार असल्याचं म्हटलं आहे.

Story img Loader