२०२२ वर्षात बॉलिवूडमध्ये बिग बजेट चित्रपट फारसे चालेले नाहीत मात्र आता बॉलिवूडकरांच्या २०२३ कडून मोठ्या अपेक्षा आहेत. २०२३ च्या जानेवारी महिन्यातच शाहरुख खानचा बिग बजेट चित्रपट प्रदर्शित होणार आहे. शाहरुख खान तब्बल ४ वर्षांनी मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. त्याचबरोबरीने आता बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर आता नव्या वर्षात दिग्दर्शनात उतरणार आहे. आपल्या पोस्टमधून त्याने हिंट दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

करण जोहरने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो सांगत आहे की त्याचे २०२२ वर्ष कसे होते. करणने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, “२०२३ हे वर्ष मला आवडणार आहे जसा सिनेमा मला आवडतो तसे,” अशा शब्दात त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

“नव्या वर्षाची सुरवात ‘पठाण’बरोबर…” शाहरुख खानने २०२३च्या शुभेच्छा देत चाहत्यांना केले आवाहन

करण जोहरच्या या पोस्टमध्ये त्याने दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांची झलक दाखवण्यात आली आहे. यानंतर करण जोहर सात वर्षांनी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मधून दिग्दर्शनाच्या जगात परतणार असल्याचे दाखवण्यात आले आहे.

‘कभी ख़ुशी कभी गम’, ‘माय नेम इज खान’ यांसारख्या चित्रपटाचे त्याने दिग्दर्शन केले आहे. २०१६ साली आलेल्या ‘ए दिल हैं मुश्किल’ या चित्रपटाचे त्याने दिग्दर्शन केले आहे. दिग्दर्शनाच्या बरोबरीने तो कॉफी विथ करण या कार्यक्रमातून होस्ट म्हणून आपल्यासमोर येतो