बॉलिवूड निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर हा कायम सोशल मीडियावर चर्चेत असतो. बॉलिवूडमधील गॉसिप आणि करण जोहरचा चॅट शो यामुळे तो चांगलाच चर्चेत असतो. गेल्या काही वर्षांपासून नेपोटीजममुळे उद्भवलेल्या वादामुळे करण जोहरवर बरीच टीका झाली. बऱ्याच कलाकारांचं करिअर उद्ध्वस्त करण्याचा आरोप करण जोहरवर बऱ्याचदा झाले आहेत. करण जोहरने अशाचप्रकारे अनुष्का शर्माचं करिअर उद्ध्वस्त करायचाही प्रयत्न केला होता.

करण जोहरने स्वतः ही गोष्ट कबूल केली होती. हा करण जोहरचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होत आहे. अनुष्का शर्माचा पहिला चित्रपट ‘रब ने बना दी जोडी’साठी सोनम कपूरला घ्यावं असं करणच्या मनात होतं. याबाबत त्याने आदित्य चोप्राकडे विनंतीही केली होती. पण त्यावेळी आदित्य चोप्राने करण जोहरची ही गोष्ट मान्य न करता अनुष्का शर्माला चित्रपटात घेतलं.

आणखी वाचा : “… म्हणून त्या कुटुंबाने नाटक अर्धवट सोडलं” प्रशांत दामलेंनी शेअर केलेला ‘तो’ अनुभव

२०१६ च्या १८ व्या मामी फेस्टिव्हलमध्ये करण जोहरने याबद्दल कबुली दिली होती. त्यावेळी ‘ए दिल है मुश्किल’ या चित्रपटाच्या निमित्ताने करण जोहरने चित्रपटातील कलाकारांसह हजेरी लावली होती. करण म्हणाला, “मला अनुष्का शर्माचं करिअर खरंच उद्ध्वस्त करायचं होतं. कारण जेव्हा मला आदित्य चोप्राने तिचा फोटो दाखवला तेव्हाच मी तिला घेऊ नकोस असा सल्ला आदित्यला दिला होता. त्यावेळी अनुष्काच्या ऐवजी माझ्या डोक्यात वेगळ्याच अभिनेत्रीचं नाव होतं.”

पुढे करण म्हणाला, “पण जेव्हा मी ‘बॅन्ड बाजा बारात’ पाहिला आणि मी स्वतः अनुष्काला फोन केला, तिची माफी मागून तिचं कौतुक करणं अपेक्षित होतं असं मला वाटलं. तिच्यासारख्या उत्कृष्ट अभिनेत्रीचं करिअर उद्ध्वस्त झालं असतं तर मी स्वतःला माफ करू शकलो नसतो.” करणचा हा व्हिडिओ रेडिट या ऑनलाइन साईटवर पुन्हा व्हायरल होत आहे. लोकांनी हा व्हिडिओ पाहून करणला पुन्हा ट्रोल केलं आहे.

Throwback to when Karan Johar wanted to end Anushka’s career
byu/bammbamm95967 inBollyBlindsNGossip

आणखी वाचा : ‘यश राज स्पाय युनिव्हर्स’मध्ये ‘या’ दाक्षिणात्य सुपरस्टारची एन्ट्री; ‘हृतिक रोशनसह ‘वॉर २’मध्ये साकारणार भूमिका

“हा जर अनुष्का शर्माच्या करिअरबद्दल असा विचार करू शकतो तर विचार करा की याने आणखी किती लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त केले असेल.” अशी कॉमेंट करत एका युझरने करणवर टीका केली आहे. अशा बऱ्याच कॉमेंट करत नेटकऱ्यांनी करण जोहरला चांगलंच ट्रोल केलं आहे. करण जोहर आता ‘रॉकी और रानी की प्रेमकहानी’ या चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून कमबॅक करणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, आलिया भट्ट हे दोघे मुख्य भूमिकांमध्ये आहेत.

Story img Loader