बॉलीवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून करण जोहरला ओळखले जाते. ९० च्या दशकातील ‘कभी खुशी कभी गम असो’ किंवा नुकताच प्रदर्शित झालेला ‘रॉकी और रानी प्रेम कहानी’ त्याच्या प्रत्येक चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. करणने नुकतीच ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या ‘एक्स्प्रेस अड्डाला’ हजेरी लावली होती. या वेळी त्याने भारतीय सिनेमात गेल्या १० ते २० वर्षांत झालेले बदल यासंदर्भात अनेक गोष्टी सांगितल्या. तसेच मध्यंतरीच्या काळात त्याच्याबद्दल सोशल मीडियावर कशी नकारात्मक पसरली होती याविषयी करणने भाष्य केलं आहे.

हेही वाचा : “शिवराय प्रेमींसाठी आऊसाहेब असणारी व्यक्ती…”, मृणाल कुलकर्णींसाठी सूनबाईंची खास पोस्ट; म्हणाली, “एकत्र काम करून…”

ajay devgan
“तो कारमध्ये एक हॉकी स्टिक…”, रोहित शेट्टीने अजय देवगणबाबत केला खुलासा; अभिनेता म्हणाला, “आता मी…”
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
Ajit Pawar on Yogi Adityanath
योगी आदित्यनाथांमुळे अजित पवारांची गोची; मोदी-शाहांची एकही सभा नाही; अस्तित्वाची लढाई राष्ट्रवादी कशी लढणार?
aishwarya narkar slams netizen who writes bad comments
“आई आणि बायकोवरून…”, आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्याला ऐश्वर्या नारकरांनी सुनावलं; म्हणाल्या, “महिलांचा…”
Vaibhav Chavan
“अंकिता आणि आमचे दाजी…”, वैभव चव्हाणने ‘कोकण हार्टेड गर्ल’बरोबरचे शेअर केले फोटो; नेटकरी म्हणाले, “विश्वास बसत नाही…”
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
Lakhat Ek Aamcha Dada
चांगले वागण्याचे नाटक करून डॅडींचा सूर्याला फसविण्याचा प्लॅन; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “तुमचं पोरगं आणि तुम्ही…”
Ajit Pawar on Ramraje Naik Nimbalkar
Ajit Pawar : “…मग मी बघतो, तुम्ही आमदार कसे राहता”, अजित पवारांचा रामराजे निंबाळकरांना इशारा; म्हणाले, “धमक असेल तर…”

करण जोहर त्याच्याविरुद्ध निर्माण झालेल्या नकारात्मकतेविषयी सांगताना म्हणाला, “बॉलीवूडमध्ये काहीही गोष्टी घडल्या की, मला ट्रोलं गेलं जातं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या नावासमोर सापाचा इमोजी लावला जातो. मला खरंच नाही आठवतं या गोष्टी केव्हापासून सुरु झाल्या. मी ट्विटरवर नसलो तरीही माझ्यामागून तो सापाचा इमोजी तिकडेही वापरला जातो याची मला कल्पना आहे.”

हेही वाचा : सिद्धार्थ चांदेकरच्या आईने केलं दुसरं लग्न, नेटकरी म्हणाले, “इतका मोठा निर्णय घेण्यासाठी…”

करण जोहर पुढे म्हणाला, “इंडस्ट्रीमध्ये काही घडलं तरी मला ट्रोलं केलं जातं…माझ्या सोशल मीडियावर असंख्य कमेंट्स येतात. मी ट्विटरवर नसल्याने इन्स्टाग्रामवर कमेंट्स करून लोक मला ट्रोल करतात. मध्यंतरी हे एवढं वाढलेलं की त्या कमेंट्स वाचून माझ्यावर परिणाम होत होता. जर ‘रॉकी और रानी…’ फ्लॉप ठरला असता तर पुन्हा ट्रोलर्स सक्रिय झाले असते.”

हेही वाचा : “माझ्या सासूचं लग्न!”, मिताली मयेकरने सासूबाईंना दिल्या दुसऱ्या लग्नाच्या शुभेच्छा; म्हणाली, “एवढा मोठा निर्णय…”

“आता हळूहळू मला याची जाणीव झाली आहे की, या सगळ्या गोष्टी फक्त आभासी आहेत आणि आपण खंबीरपणे याला तोंड दिलं हवं. माझ्या फोटोंवर अजूनही काही लोक विचित्र कमेंट्स करतात. आता मी पूर्वीपेक्षा बरंच दुर्लक्ष करतो पण, हे ट्रोलर्स ज्या कमेंट्स करतात त्या वाचून अनेकदा मला आश्चर्य वाटतं, एवढी नकारात्मकता कुठून येते हे मला समजत नाही.” असं करण जोहर म्हणाला. दरम्यान, त्याच्या अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘रॉकी और रानी प्रेम कहानी’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा गल्ला जमावला आहे.