गेल्या काही वर्षात ओटीटी प्लॅटफॉर्म हे मनोरंजनाचं एक महत्वाचं माध्यम म्हणून उदयास आलं आहे. अनेकजण मालिका किंवा चित्रपट बघण्यापेक्षा ओटीटीवरील कलाकृती पाहण्याला प्रधान्य देताना दिसतात. ओटीटीवर विविध विषय हाताळले जातात. काहीवेळा ओटीटीवर दाखवल्या जाणाऱ्या दृश्यांमुळे अनेकदा यातील कलाकृतींना प्रेक्षक विरोध करतात. तसंच ओटीटीवर महिलांचं योग्य चित्रण केलं जात नाही असंही बरेचदा बोललं जातं. आता यावर मधुर भांडारकर यांनी भाष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिग्दर्शक मधुर भांडारकर हे नेहमीच त्यांच्या चित्रपटातून वेगवेगळे महत्वाचे विषय हाताळत असतात. आता ते त्यांच्या ‘इंडिया लॉकडाऊन’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. करोनामुळे देशभरात लागू झालेल्या टाळेबंदीवर आधारित ‘इंडिया लॉकडाऊन’ हा मधुर भांडारकर दिग्दर्शित चित्रपट लवकरच ‘झी 5’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवरून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यानिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी महिलांचं ओटीटीवर होणारं चित्रण याबद्दल त्यांचं मत व्यक्त केलं आहे.

आणखी वाचा : “मी नाकारली होती ‘सेक्रेड गेम्स’ची ऑफर पण…”; अभिनेत्याचा खुलासा

नुकतीच त्यांनी ‘बॉलिवूड हंगामा’ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना “ओटीटीवर महिलांचं चित्रण योग्यप्रकारे केलं जातं आणि त्यांना चांगली संधी उपलब्ध होते याबद्दल तुम्हाला काय वाटतं?” असा प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी मोकळेपणाने उत्तर दिलं. ते म्हणाले, “हो. ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे अभिनेत्रींना उत्तम संधी उपलब्ध होत आहेत. फक्त स्री कलाकारच नाही तर अभिनेत्यांनाही ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे खूप चांगल्या संधी उपलब्ध होत आहेत. आता अनेकजण ओटीटी स्टार म्हणूनही ओळखले जातात. आता ओटीटी अवॉर्ड्सही आहेत. त्यामुळे ओटीटीमुळे सर्वांनाच चांगली संधी उपलब्ध झाली आहे आणि यापुढेही हे असंच राहणार आहे.”

हेही वाचा : सई ताम्हणकरने सुरू केली नव्या लॉकडाऊनची तयारी, फोटो पोस्ट करत म्हणाली…

मधुर भांडारकर यांनी ‘इंडिया लॉकडाऊन’ चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात सई ताम्हणकर, प्रतीक बब्बर, श्वेता बासु प्रसाद, आहाना कुमरा आणि प्रकाश बेलवाडी या कलाकारांनी काम केलं आहे. हा चित्रपट २ डिसेंबर रोजी ‘झी 5’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Director madhur bhandarkar expressed his views about potrayal of women rnv