दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा चित्रपट ‘दिल बेचारा’ २०२० साली प्रदर्शित झाला. ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला होता. आता लवकरच या चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक मुकेश छाब्रा यांनी ट्विट करत ही बातमी दिली आहे.

१४ जून २०२० रोजी सुशांत सिंह राजपूत याचे निधन झाले. मुंबईतील बांद्रा येथील निवासस्थानी त्याने गळफास घेत आत्महत्या केली होती. सुशांतच्या मृत्यूने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. सुशांतच्या निधनाच्या एक महिन्यानंतर म्हणजे जुलै २०२० मध्ये त्याचा ‘दिल बेचारा’ हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला. या चित्रपटात सुशांतबरोबर संजना सांघीची प्रमुख भूमिका होती. आता लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित होणार आहे.

Theatre canteen owner bites man's ear over food bill during 'Pushpa 2' screening.
Pushpa 2 : चित्रपटगृहाच्या कॅन्टीन मालकाने घेतला पुष्पा २ पाहायला आलेल्या प्रेक्षकाच्या कानाचा चावा, मध्यांतरावेळी नेमकं काय घडलं?
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
zee marathi satvya mulichi satavi mulgi serial off air
‘झी मराठी’ची लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप! ‘शेवटचा दिवस’ म्हणत कलाकारांनी शेअर केले सेटवरचे फोटो
Pushpa 2 Movie News
Pushpa 2 : ‘पुष्पा 2’ हजार कोटींच्या क्लबमध्ये, इतकी बक्कळ कमाई करणारे आणखी सहा चित्रपट कुठले?
Rajdutta
६० वर्षांपूर्वी ‘इतक्या’ रुपयांत बनायचे चित्रपट; ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांचा खुलासा, म्हणाले…
samruddhi expressway 233 deaths
दोन वर्षे, दीड कोटी वाहने, १४० अपघात, २३३ मृत्यू!
Bhoot Bangla Release Date
भीती आणि हास्याचा दुहेरी डोस घेऊन येतोय अक्षय कुमार; ‘या’ तारखेला ‘भूत बंगला’ चित्रपट होणार प्रदर्शित
upendra limaye first telugu film director praises him
उपेंद्र लिमयेंचा पहिला तेलुगू चित्रपट! थेट दाक्षिणात्य दिग्दर्शकाकडून कौतुक; म्हणाला, “सर कोणतीही भूमिका…”

हेही वाचा- Video : आयरा खानची नणंद आहे ‘ही’ मराठी अभिनेत्री, लग्नात सासूबाईंनी दाखवली नुपूर शिखरेची मानलेली बहीण

दिग्दर्शक मुकेश छाब्रा यांनी ट्विट करत ‘दिल बेचारा २’ ची घोषणा केली आहे. छाब्रा यांनी ट्विटमध्ये फक्त “Dil Bechara 2” एवढंच लिहिलं आहे. मात्र, अद्याप त्यांनी चित्रपटाचे कथानक किंवा कलाकारांबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. छाब्रा यांच्या ट्विटवर अनेक चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंट केल्या आहेत. तसेच ‘दिल बेचारा २’ मध्ये सुशांतच्या जागी कोणता अभिनेता झळकणार याबाबत सगळ्यांना उत्सुकता लागली आहे.

सुशांतच्या निधनानंतर प्रदर्शित झालेला ‘दिल बेचारा’ चित्रपट बघताना अनेक चाहते भावुक झाले होते. प्रदर्शनाच्या २४ तासांमध्येच या चित्रपटाला जवळपास ९५ मिलियन व्ह्यूज मिळाले होते. जॉन ग्रीन यांच्या ‘द फॉल्ट इन आवर स्टार्स’ या पुस्तकाच्या कथेवर आधारित हा चित्रपट बनवण्यात आला होता. आजही सुशांतच्या आठवणीत अनेक चाहते हा चित्रपट बघतात. आता प्रेक्षक ‘दिल बेचारा २’ ची आतुरतेने वाट बघत आहेत.

Story img Loader